आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली:जगात कुठेही कोरोना नाही, ज्यांचे मृत्यू झाले ते जगायच्याच लायकीचे नव्हते!; शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची जीभ पुन्हा घसरली

सांगली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारचा ‘मास्क’ सक्तीच्या धोरणालही त्यांनी तीव्र विरोध दर्शवला

जगात कोठेही कोरोना अस्तित्वात नाही. ‘ज्याला जगायचे असेल तो,जगेल ज्याला मरायचे असेल तो मरेल.’ या प्रश्‍नात केंद्र व राज्य सरकारने लक्ष घालू नये. ज्यांचा मृत्यू झाला ते जगायच्या लायकीचे नव्हते. देशातील व्यवहार पूर्ववत केला जावा, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली. सरकारचा ‘मास्क’ सक्तीच्या धोरणालही त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या साखळीला खंड पाडण्यासाठी लॉकडाऊनचा आदेश दिला आहे. या निर्णयाविरोधात सांगलीतील व्यापाऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी भिडे बोलत होते. गेले वर्षभर कोरोना संदर्भात केंद्र व राज्य सरकारने उचललेल्या विविध उपाययोजनावरही त्यांनी जोरदार टीका केली.

भिडेंची मुक्ताफळे :

  • काळ्याकुट्ट अंधारात काळे मांजर शोधण्यासारखे कोरोनाचा शोध घेणे सरकारने त्वरीत थांबवावे. सध्या कोरोनाची भीती दाखवून दोन्ही सरकारे प्रजेला भीतीच्या सावटाखाली ठेवत आहेत. कोरोना कोरोनाचा नारा देत सर्वसामान्य जनता भंपक व बावळट बनत चालली आहे. जिवाची काळजी जो तो घेईल, सरकारने या प्रश्नात लक्ष घालू नये.
  • प्रशासन पारदर्शक ठेवण्यासाठी कारभार करावा. लॉकडाऊन करून सर्वसामान्य जनेतला वेठीस धरणे योग्य नाही. केंद्र सरकारने शिवाजी, संभाजी महाराजांचे आदर्श ठेवून रयतेसाठी राज्य केले पाहिजे. महात्मा गांधींच्या नोटेवरचे चिन्ह ताबडतोब हटवून गांधीवादी विचारसरणी संपुष्टात आणावी, असा सल्लाही भिडे यांनी दिला.
बातम्या आणखी आहेत...