आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:माकप राज्य समितीची साेलापुरात बैठक

सोलापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माकपच्या राज्य समितीची बैठक साेलापुरात घेण्याचे ठरले आहे. ६ ते ८ डिसेंबर असे तीन दिवस हाेणाऱ्या या बैठकीसाठी नेते उपस्थित राहतील. आगामी निवडणुकीची रणनीतीही ठरवण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांनी दिली.महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे खासगीकरण, दलित-अल्पसंख्याक आदिवासींवरील वाढते हल्ले आदी विषयांवरही चर्चा हाेईल.

शिवछत्रपती रंगभवन येथे हाेणाऱ्या या बैठकीसाठी पक्षाचे नूतन पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, माजी खासदार नीलोत्पल बसू, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महासचिव मरियम ढवळे, माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर, आदिवासी व शेतकरी नेते माजी आमदार जीवा पांडू गावित यांचा कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.

सार्वत्रिक निवडणुका,धाेरणांवर चर्चा हाेईल
आगामी महापालिका, विधानसभा, लाेकसभा निवडणुकांविषयी बैठकीत चर्चा हाेईल. त्याशिवाय केंद्रीय धाेरणांवरही चर्चा हाेईल. महागाई, खासगीकरण, बेराेजगारी हे विषय ज्वलंत बनलेले आहेत. त्यावर पक्षाची भूमिका जाहीरच आहे. त्याला पुढील दिशा मिळेल. नरसय्या आडम, माकप ज्येष्ठ नेते

बातम्या आणखी आहेत...