आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाढा शहरात अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. 13 वर्षीय शाळकरी मुलीला चॉकलेट देण्याचा बहाणा करून नराधमाने अत्याचार केला आहे. ही घटना बस स्थानक परिसरात सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे.
पीडित मुलीने माढा पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार सोमवारी रात्री उशिरा बाललैगिंक अत्याचार/ पोक्सो कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप मनोहर जगदाळे असे त्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान माढा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
असे घडले प्रकरण?
या घटनेची अधिक माहिती अशी की, पिडीत मुलगी माढ्यातील एका माध्यमिक शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. माढा शहरानजीक असलेल्या गावातील ही मुलगी आहे. सध्या एसटीचा संप सुरु असल्याने ती मुलगी पायी चालत शाळेला आली होती. दरम्यान, शाळा सुटल्यानंतर घरी जायला एखादे वाहन अथवा एसटी आहे का, पाहण्यासाठी ती बस स्थानकाकडे आली होती. वर्गातच कंपास विसरले गेल्याने ती बस स्थानक परिसरात असलेल्या एका बेकरीत दप्तर ठेऊन शाळेत गेली होती. माघारी आली तेव्हा ठेवलेल्या ठिकाणी दुकानात दप्तर नव्हते. आत बेकरीत दप्तर पाहण्यास पिडीत मुलगी गेली असता या मुलीस चॉकलेटचा बहाणा करुन तिच्या सोबत आरोपीने अत्याचार केले.
घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किरण घोगडे करीत आहेत. माढा पोलिसांत पालकांसोबत येऊन पिडीत मुलीने घडलेल्या घटनेची सविस्तर हकिकत पोलिस अधिकाऱ्यांना सांगुन फिर्याद दिली.
घटना घडताच आरोपीचे पलायन
घटना घडली तेव्हा मुलीने दुकानात आरडा ओरड केली. या आवाजाने परिसरातील लोक जमा झाले. मात्र बसस्थानकातील महिलांकडे जाऊन घटनेचा उलगडा केला. घटनेच्या ठिकाणाहून आरोपी जगदाळे याने निसटता पाय काढुन तेथून पलायन केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.