आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमाणपत्र व ओळखपत्र:टीईटी प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवारांची गर्दी‎

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण‎ विभागात सोमवारपासून टीईटी प्रमाणपत्र‎ वितरण करण्यास सुरुवात केली आहे.‎ पहिलाच दिवस असल्याने उमेदवारांनी‎ एकच गर्दी केली होती. तालुक्याच्या‎ ठिकाणाहून पुरुष व महिला उमेदवार हजर‎ राहिल्या होत्या. टेटचे प्रमाणपत्र ६‎ एप्रिलपर्यंत दिले जाणार आहे. तरी‎ नागरिकांनी सुटी दिवशीही प्रमाणपत्र घेऊन‎ जाण्यासाठी यावे , असे आवाहन‎ शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.‎ टीईटी प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवारांनी‎ शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्राची मुळ व‎ सत्य प्रत किंवा परीक्षा शुल्क भरलेल्या‎ चलनाची मुळ प्रत, सत्य प्रत आवश्यक‎ आहे. डीटीएड उत्तीर्ण गुणपत्रिकेची किंवा‎ प्रमाणपत्राची सत्यप्रत अथवा बीएड उत्तीर्ण‎ गुण पत्रिकेची सत्यप्रत, आरक्षण प्रवर्गाचे‎ प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र‎ यांच्या सत्य प्रती अपंग असल्यास अपंगाचे‎ प्रमाणपत्र व ओळखपत्र आदी कागदपत्रे‎ सोबत आणणे आवश्यक आहे.‎