आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:सूर्याजी पिसाळसारख्या‎ प्रवृत्ती ठेचून काढा; जाधव‎

सोलापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात‎ सूर्याजी पिसाळ यांच्या‎ फितूरपणामुळे रायगड मोघलांच्या‎ हाती गेला. आजही समाजात‎ पिसाळसारख्या प्रवृत्ती आहेत. त्या‎ ठेचून काढण्याची गरज असल्याचे‎ प्रतिपादन, इतिहास अभ्यासक प्रा.‎ ज्ञानेश्वर जाधव यांनी केले.‎ छत्रपती शिवाजी प्रशालेत‎ बुधवारी विजयादशमीनिमित्त मराठा‎ समाज सेवा मंडळातर्फे आयोजित‎ व्याख्यानात प्रा.जाधव बोलत होते.

‎ शिवकालीन समाजातील सूर्याजी‎ पिसाळ यांचे स्थान हा त्यांच्या‎ व्याख्यानाचा विषय होता.‎ अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष‎ विनायकराव पाटील होते. यावेळी‎ संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे,‎ सचिव नामदेव थोरात, संचालक‎ महादेव गवळी, अशोक चव्हाण,‎ सूर्यकांत इंगळे, शिवदास चटके,‎ सुनीता साळुंखे, रेखा सपाटे आदी‎ उपस्थित होते.

प्रास्ताविक‎ सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष‎ ज्ञानेश्वर सपाटे यांनी केले.‎ सूत्रसंचालन सारिका महामुनी यांनी‎ आभार महेश माने यांनी मानले.‎ ‎ सपाटे व्यासपीठावरून थेट‎ रुग्णालयात मराठा समाज सेवा‎ मंडळाच्या दसरा महोत्सवास‎ उपस्थित संस्थेचे अध्यक्ष तथा माजी‎ महापौर मनोहर सपाटे यांना‎ अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने‎ तत्काळ त्यांना व्यासपीठावरून थेट‎ भय्या चौकातील श्रीराम हार्ड केअर‎ सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल‎ करण्यात आले. त्यामुळे काही काळ‎ वातावरण सुन्न झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...