आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात अंतरपीक म्हणून पिकवली गांजाची शेती:मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्याचा प्रताप; गुन्हा दाखल

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोहोळ तालुक्यातील दादपूर गावच्या शिवारात एका शेतकऱ्याने उसाच्या पिकात गांजाची लागवड केल्याची माहिती कामती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांच्या पथकाने कारवाई केली.

गांजाचे वितरण तसेच उत्पादनावर बंदी असूनदेखील या शेतकऱ्याने अवैध पद्धतीने गांजाची शेती केली होती. या कारनाम्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. नंतर पोलिसांनी कारवाई करून या शेतकऱ्याकडून तब्बल 9 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्या ठिकाणी लहान मोठी 75 गांजाची झाडे आढळून आली. तब्बल 9 लाख रुपयांचा गांजा जप्त केला असून याप्रकरणी शेतकऱ्यावर कामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाजीराव लोभा राठोड असे गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. लामाणतांडा कामती खुर्द येथील बाजीराव लोभा राठोड याचे दादपूर गावच्या शिवारात शेती आहे. त्यामध्ये ऊसाचे क्षेत्र आहे. त्या ऊसामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केल्याची माहिती कामतीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांना मिळाली.

पिकात छापा टाकला असता त्या ठिकाणी गांजाची ओली हिरवट रंगाची पाला असलेली एकूण लहान मोठी 75 झाडे आढळून आली. पोलिसांनी त्यावर कारवाई करत 90.790 कि.लो. गांजा जप्त केला. त्याची अंदाजे किंमत 9 लाख 7 हजार 900 रुपये होत आहे. याप्रकरणी अमली पदार्थ अधिनियम कलमानुसार बाजीराव लोभा राठोड या शेतकऱ्यावर कामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची फिर्याद पोलिस हेडकॉन्स्टेबल युवराज कासवीद यांनी दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने करीत आहेत.

अशी करतात गांजाची शेती?

गांजाची शेती कशी केली जाते? गांजाच्या रोपांची लागवड ही बाजरी, मका, कापूस या पीकांच्या मध्ये केली जाते. बाजरी किंवा मका यांच्या झाडांशी गांजाची झाडे मिळतीजुळती असल्याने लांबून बघितले असता या दोन पीकांमधला फरक पटकन कळून येत नाही. तसेच तुरीची पीकातसुध्दा गांजाच्या रोपांची लागवड केली जाते.

बातम्या आणखी आहेत...