आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदी अंतर्गत गुन्हा:राज्य उत्पादनच्या जवानाला कोठडी

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील लाच मागणाऱ्या जवानाला ५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. मलंग गुलाब तांबोळी (वय ३३, रा. ओम गर्जना चौक, जुळे सोलापूर) याने २० हजार रुपयांची लाच मागितली हाेती. एका व्यक्तीवर दारूबंदी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यात मदत करतो असे सांगून ३० हजारांची लाच मागितली होती. त्यानंतर २० हजारांची लाच मागितल्याने त्याला अटक करून अतिरिक्त सत्र न्यायाधिश रेखा पांढरे यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस कोठडी मिळाली आहे. यात सरकारतर्फे अॅड. दत्ता पवार, आरोपीतर्फे अॅड. विद्यावंत पांढरे यांनी काम पाहिले. मलंग तांबोळी याच्या घराची एसीबी पथकाने झडती घेतली.

बातम्या आणखी आहेत...