आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळा चिरून खून:पत्नी व तिच्या प्रियकराला कोठडी ; गंगाई केकडे नगरातील खून प्रकरण

सोलापूर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगाई केकडे नगरातील तरुणाच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या बाबासाहेब जालिंदर बाळशंकर आणि त्याची प्रेयसी, मृताची पत्नी अरुणा नारायणकर यांना न्यायालयाने सोमवार (दि. २६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या दोघांनी मिळून बुधवारी पहाटेच्या वेळी दशरथ नारायणकर या ३५ वर्षांच्या तरुणाचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून केला होता.

दोघांनाही जिल्हा न्यायालयात उभे केल्यानंतर सरकारी पक्षाने एकूण प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयापुढे कथन केले. दोघांनी मोबाइल व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करून खुनाचा कट रचला. झोपेच्या गोळ्या, नॉयलॉन दोरी आणि चाकूची खरेदी केली होती. या वस्तू कुठून घेतल्या. यात मदत करणारे आणखी काही जण आहेत का? याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे म्हटले. न्यायालयाने ही मागणी मान्य करून पोलिस कोठडी सुनावली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या खूनप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तपासातील पथकाने संशयित बाबासाहेब बाळशंकर याच्या डोंबरजवळगे (ता. अक्कलकोट) गावातील घरी झडती घेतली. अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने यांनी सांगितले.