आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल वाटप:सरस्वती मंदिरमध्ये सायकल बँक अभिनव उपक्रम सुरू

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज दि. ७ सप्टेंबर रोजी श्री सरस्वती मंदिर संस्थेने, स. हि. ने. हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना सायकल वाटप करून सायकल बँक ही अभिनव योजना सर्व शाळांसमोर मांडली आहे.

ही कल्पना प्रथम दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. शिक्षण विभाग यांनी मांडली होती. ती श्री सरस्वती मंदिर संस्थेने उचलून धरली. आणि याला रोटरी क्लबचे अध्यक्ष, डाॅ. निहार बुरटे, सचिव धनश्री केळकर, मधुरा वडापूरकर, सदस्य, सोमनाथ बावी, बाबुलालभाई मेहता, दिनेश अग्रवाल, डाॅ. गिरिश कुमठेकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग किरण लोहार याशिवाय संजय मर्दा, स्लिम हेल्थ क्लब, नम्रता एडके, श्रीपाद येरमाळकर या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने, तसेच श्री सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष शिरीष तुळजापूरकर, कार्यवाह किरण करकमकर, ज्येष्ठ सदस्य मोहन दाते यांच्या सहकार्याने ही योजना फलद्रूप झाली आहे. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका नीता येरमाळकर, पर्यवेक्षक देव, सर्व शिक्षक उपस्थित होते. खरे तर दाता म्हणजे दानशूर व्यक्ती मोठ्या भाग्यानेच जन्माला येतात असे म्हणतात, अशा भाग्यवंतांच्या सहकार्याने श्री सरस्वती मंदिर संस्थेने एक अभिनव उपक्रम सुरू करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

बातम्या आणखी आहेत...