आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:विमानसेवेसाठी चक्री उपोषण सुरू

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

होटगी रोड विमानतळ येथून विमानसेवा सुरू करा, अशी मागणी करत सोलापूर विकास मंचने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर रविवारी चक्री उपोषण सुरू केले आहे. शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपोषणात सहभागी झाले.

प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला. तरीही विमानसेवा सुरू होत नसल्याने रविवारपासून चक्री उपोषण सुरू करण्यात आले. चक्री उपाेषणात महिलांचाही सहभाग होता. भाजपचे माजी आमदार नरसिंग मेंगजी, प्राणिमित्र विलास शहा, अॅड. प्रमोद शहा, योगीन गुर्जर, विजय जाधव, डाॅ. सुरेश खमितकर, सलीम शेख, चेतन चौधरी आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते.

आजही सुरू राहील उपोषण : विमानसेवेचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे. आंदोलनाबरोबर स्वाक्षरी मोहीम घेण्यात येत आहे. सोमवारी आंदोलन सुरूच राहील, असे मंचच्या वतीने सांगण्यात आले.

राजकीय इच्छाशक्ती हवी
सोलापूरच्या बाजूला असलेल्या कर्नाटकातील विजयपूर आणि कलबुर्गीत विमानसेवा सुरू झाली, सोलापुरात का नाही? राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.''-चेतन चौधरी, युवक

एकत्रित प्रयत्न हवेत
सोलापूरचा विकास आणि उद्योग वाढीसाठी विमानसेवा आवश्यक आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.''-सलीम शेख, नागरिक

बातम्या आणखी आहेत...