आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष:केळी बागांचे नुकसान; पंचनामे करण्याबाबत प्रशासन उदासीन

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरिप हंगामात वादळ, ढगफुटीसारखा पाऊस काही भागात झाल्याने केळी बागांचे मोठे नुकसान झाले. सोलापुरातील माढा, करमाळा भागामध्ये असे प्रकार घडले आहेत. नुकसानीचे पंचनामे करायला प्रशासनाला वेळ नाही, कृषिमंत्री कोण आहेत, हे समजत नाही. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी रोज नव-नवे विषय चर्चेला आणून त्यामध्ये जनतेला गुरफटत ठेवण्याचा प्रकार राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे, असा आरोप खोत यांनी केला.

विनोदवीरांनी आता थोडा संयम ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. मी स्वत: विधानपरिषदेची उमेदवारी मागे घेतल्यावर घरी न जाता शेतकऱ्यांच्या थेट बांधावर गेलो, त्यांच्या अडचणी, प्रश्न समजून घेतोय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत कायम राहणार आहे. भविष्यात आणखी पुढे जाण्यासाठी आता दोन पावलं मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...