आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:वीजपुरवठा सुरळीत करून पिकांचे नुकसान टाळावे ; बागल

करमाळा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पूर्व भाग, कंदर परिसर व इतरत्र वीज वितरण कंपनीने वीज बिलांच्या वसुलीसाठी सरसकट कोणालाही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हाेत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी दिग्विजय बागल यांनी केली. वास्तविक त्यामुळे रब्बी पिके कांदा, ज्वारी, त्याचबरोबर ऊसपिकांचेही नुकसान होणार आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वीजपुरवठा बंद केल्याने जनावरांचे अतोनात हाल होत आहे.

वीजमंडळाने आपल्या बिलांच्या वसुलीसाठी सरसकट वीज बंद करणे ही बाब गंभीर व चुकीची आहे. वास्तविक पाहता वीज कंपनीने शेतकऱ्यांना पूर्वसूचना अथवा नोटीस द्यायला हवी होती. परंतु कंदर वीज उपकेंद्र अचानकपणे बंद केले गेले. तसेच पूर्व भागातही गौंडरे, कोळगाव या गावातील डीपी बंद केले आहेत. तालुक्यातील पश्चिम भाग रावगाव, मांगी, पोथरे या भागातही शेतकरी धास्तावले आहेत. शेतकऱ्यांनीही वीज बिल वेळेवर भरणे गरजेचे आहे. परंतु सरसकट वीज बंद करू नये.

बातम्या आणखी आहेत...