आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर:दारफळ डिसीसी बँकेच्या क्लार्कची गळफास घेत आत्महत्या, कारण गुलदस्त्यात

संदीप शिंदे | माढा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माढा तालुक्यातील दारफळ(सिना)गावच्या डिसीसी बॅकेच्या क्लार्कने गळफास घेऊन जीवन संपवले

माढा तालुक्यातील दारफळ (सिना) गावच्या डीसीसी बँकेच्या क्लार्कने गळफास घेऊन जीवन संपवले अभिमान साहेबराव उबाळे (वय५०) असे आत्महत्या केलेल्या क्लार्कचे नाव आहे. मंगळवारी सकाळी दारफळ (सिना) गावच्या शिवारात ही घटना सकाळी ९ च्या सुमारास उघडकीस आली. उबाळे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट असुन पोलिस तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे. दारफळ महातुपर रस्त्यावरील शिंदे, गुरव यांच्या शेतातील बांधावरील झाडाला त्यांनी गळफास घेतला. मृत उबाळे याच्या चुलत भावाने माढा पोलिसांत अज्ञात कारणाने आत्महत्या केल्याची खबर दिली आहे. उबाळे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

२२ वर्षापासुन डीसीसी बँकेत कार्यरत

उबाळे हे गेल्या २२ वर्षांपासून डीसीसी बँकेत कार्यरत होत. त्यांनी कुर्डूवाडी, मानेगावच्या शाखेत शिपाई म्हणून कामकाज पाहिले होते. दारफळ(सिना) शाखेत येण्यापूर्वी त्यांना नुकतेच शिपाई पदावरून क्लार्कची पदोन्नती मिळाली होती. दारफळ शाखेत येऊन त्यांना एक वर्ष झाले होते.

बातम्या आणखी आहेत...