आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:जागतिक पॅराअॅथलेटिक्स स्पर्धेसाठी अकलूजच्या दत्ता वरकड याची निवड

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील माजी अॅथलेट व माळशिरस तालुक्यातील चाकोरे येथील दत्ता वरकड याची भारतीय संघात निवड झाली. इटली येथे होणाऱ्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स-ग्रॅण्ड प्रिक्स इटालियन ओपन २०२२ स्पर्धेसाठी १०० मीटर धावणे व लांब उडी प्रकारात त्याची निवड झाली. त्यास क्रीडा शिक्षक प्रा. अरविंद वाघमोडे व पिंपरी चिंचवड शहर अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष रामदास कुदळे, उपाध्यक्ष रूस्तुम पठाण, कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव चंद्रशेखर कुदळे, खजिनदार मनीषा जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

या निवडीबद्दल सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते, प्र. प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे यांनी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...