आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवास:दौंड ते सोलापूर रेल्वे धावताहेत विजेवर, प्रवाशांचे वाचतील 2 तास

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर विभागातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या असंख्य गाड्या आता विजेच्या इंजिनवर धावत आहेत. विशेष म्हणजे या गाड्या आता बाळे ते मोहोळ (२९ किमी) दरम्यान डिझेल वर चालत असत. मात्र आता त्या पूर्णतः विजेवर सुरू करण्यात आल्या आहेत.

आता येत्या काळात प्रवाश्यांच्या कोणत्याही प्रवासातील दीड ते दोन तास वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे दक्षिण भारत ते सोलापूर आणि पुणे मुंबई या लांब पल्ल्याच्या गाड्या या विजेवर ११० वेगाने धावणार आहेत. सिद्धेश्वर एक्सप्रेस, गदग एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस, एक्सप्रेस, चेन्नई- एलटीटी, कुर्ला एक्स्प्रेस, हुसेन सागर एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्स्प्रेस यासह विभागात धावणाऱ्या ६० हून अधिक गाड्या या वेगाने धावणार आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

प्रवाशांना फायदा
रेल्वेचे इंजिन विजेवर धावणारे सुरू झाल्यामुळे वेळेची बचत होऊन प्रवाशांना त्यांचा प्रवास सुखकर करता येईल. ही गोष्ट स्वागतार्ह आहे सोलापूर रेल्वे विभागाने सुरू केलेल्या या नव्या सुविधेचा प्रवाशांना फायदा होईल.
राजेंद्र कांबळे, रेल्वे प्रवासी संघटना

प्रायोगिक प्रवास सुरू
नुकतेच राष्ट्रीय सुरक्षा आयुक्त रेल्वे विभाग यांनी मोहोळ ते सोलापूर रेल्वे स्टेशन या मार्गावरील २९ किलोमीटरचे निरीक्षण करून हा टप्पा पूर्णपणे यशस्वी झाला असल्याचे जाहीर केले. त्यानंतर रोज काही निवडक गाड्यांना विजेवर चालणारे इंजिन लावून पाठवल्या व आणल्या जात आहेत. यामुळे प्रवास सुखकर होईल यात काही शंका नाही.
प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक

बातम्या आणखी आहेत...