आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • De addiction, Awakening From Harinam Week For Unity, Youth Initiative In Mandrup, Tree Planting With Parayana, Public Awareness Through Cleanliness Campaign | Marathi News

दिव्य मराठी विशेष:व्यसनमुक्ती, एकसंघतेसाठी हरिनाम सप्ताहातून जागर, मंद्रूपमधील युवकांचा पुढाकार, पारायणासह वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमेतून जनजागृती सुरू

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाईलचा जास्त अन् चुकीचा वापर, चुकीची संगत अन् वाढती व्यसनाधीनता या विळख्यात तरुणाई गुरफटत आहे. वाईट गोष्टींपासून दूर करण्यासह, एकात्मता वाढण्यासाठी मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील युवकांनी अखंड हरिनाम सप्ताह, शिवलीलामृत ग्रंथ पारायणसह, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.

मंद्रूप हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकवस्तीचे गाव. २० वर्षांपूर्वी गावामध्ये दोनदा श्री रामायण ग्रंथाचे पारायण झाले होते. तेव्हापासून मधला मारुती मंदिरात दररोज हरिपाठ, भजन होते. गावातील काही युवकांनी आठ वर्षांपासून मंद्रूप-पंढरपूर पायी-वारी सुरू केली. मंदिरात भजनाच्या निमित्ताने जमणाऱ्या ज्येष्ठ मंडळीच्या समवेत काही मोजके तरुण भजनामध्ये सक्रिय सहभागी होऊ लागले. विविध व्यवसनांमध्ये गावातील काही तरुणाई गुरफटत होती. त्या मित्रमंडळींना व्यसनांमधून बाहेर काढण्यासाठी गावामध्ये संत विचार, सत्संग कार्यक्रम निमित्ताने विधायक उपक्रमांची चळवळ सुरु करण्याचा निर्धार जय हनुमान भजनी मंडळाने केला. सकारात्मक विचार, एकसंघता वाढेल या उद्देशाने अखंड हरिनाम सप्ताहाच्या आयोजनाची इच्छा भजनी मंडळातील युवकांनी गावातील ज्येष्ठ मंडळी समोर व्यक्त केली. त्यास सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसादासह, सर्वतोपरी सहकार्याचे पाठबळ दिले. मागील दीड महिन्यांपासून गावातील युवक तयारीसाठी धडपडत आहेत. सप्ताहाच्या निमित्ताने मोबाइलचा वापर गरजेपुरताच करणे, मावा-तंबाखूचे व्यसन करायचे नाही, असा निर्धार सप्ताहामध्ये सहभागी झालेल्या काही तरुणांनी केला आहे. तसेच, व्यसनांमध्ये गुरफटलेल्या काहींना व्यसनमुक्त करण्यासाठी त्यांनाही सहभागी करून घेतले आहे. गुढी पाडव्यापासून हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण सुरु झाले आहे. त्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे जय हनुमान मंडळाचे अध्यक्ष बबन देशमाने यांनी सांगितले.

‘आम्ही मंद्रूपकर’ अभियानाची विधायक कृतिशीलता
नोकरी, व्यवसायाच्या कामात गुंतलेल्या युवकांनी ‘आम्ही मंद्रूपकर’ अभियानाच्या निमित्ताने सार्वजनिक उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांसाठी नैसर्गिक रंग तयार करण्याची कार्यशाळा घेतली. धुळवडीच्या दिवशी हिंदू स्मशाभूमीची स्वच्छता करून पक्षी-धाम सुरू केले. गुढीपाडवाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर व परिसरात स्वच्छता सेवा केली.

बातम्या आणखी आहेत...