आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआई म्हणजे बोटांनी आपल्या नाकाकडे सरकवली जाणारी नथ अशी खुण, तर बाबा म्हणजे ओठावर बोट फिरवून दाखवली जाणारी मिशी अन गोल फिरवला जाणारा हात म्हणजे बाहेर फिरायला जायचे आहे. तर बोटांची हालचाल म्हणजे पाऊस अशा अनेक शब्दांची चिन्ह सांकेतिक भाषेतून सांगत सांकेतिक भाषा शिक्षकांनी मूकबधिर मुलांना संवादाचे नवे शस्त्र दिले. निमित्त होते, मूकबधिर मुलांच्या सांकेतिक भाषेच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे.
गुरुवारी 4 ऑगस्ट रोजी सकाळी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत ममता मूकबधिर विद्यालयातील मुकबधिर व मुकबधिर एकात्मिक शिक्षण योजनेतील मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती वाचा व भाषा विकासासाठी पुनर्वसन कार्यशाळेचे व सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या दिवसभराच्या कार्यशाळेत सांकेतिक शिक्षक श्वेता आवळे आणि अनिकेत तामचीकर यांनी लेखन वाचन व अबँकस गणिताचे प्रशिक्षण मुलांना दिले.
यात 70 मुलांनी सहभाग नोंदविला होता.या कार्यक्रमाचे उद्धघाटन नरेश गुरुबानी मुख्याध्यापक शशी येलगुलवार आणि संस्थेचे प्रमुख प्रकाश यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी सर्व शिक्षक मंडळी उपस्थित होते.
मुलांनी लुटला आनंद
आईला काय म्हणायचे किंवा तिला कशा पद्धतीने बोलवायचे याची खुण बाबांची खुण काय , पाऊस कसा पडतो मला बाहेर फिरायला कसं जायचं आहे किंवा मला आणखीन हवं आहे. एखादा मित्र एखादी मैत्रीण यांना कशा पद्धतीने बोलवायचे आपल्याला काय हवं असल्यास कसं सांगायचं या सगळ्या गोष्टींचा सांकेतिक चिन्हांमध्ये वर्णन करून मुलांना त्याची सखोल माहिती या शिक्षकांनी दिली. यावेळी मुलांनी आपल्याला नवकाही तरी शिकता आलं याचा मनमुराद आनंद लुटला आणि तो त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
याचाही लाभ घ्यावा
मुकबधिर विद्यार्थ्यांच्या कानाची ऐकण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुलांना इअरमोल्ड बनवणे व ऑडीओमेट्रीव्दारे (BERA) श्रवण-हास काढणे शिबीराचे आयोजन दिनांक 6 ऑगस्ट आणि 8 ऑगस्ट रोजी आयोजित केले आहे. मुंबई येथील राकेश मकवाना, डॉ. ऋषीकेश चौगुले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.