आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Decision In The Presence Of MLA Mohite, More Than 514 Families Will Get Pucca Houses; MHADA Housing Project To Be Implemented In Akluj |marathi News

दिव्य मराठी विशेष:आमदार मोहिते यांच्या उपस्थितीत निर्णय, 514 हून अधिक कुटुंबांना मिळणार पक्की घरे; अकलूजमध्ये राबविणार म्हाडाचा गृहनिर्माण प्रकल्प

अकलूज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गावठाणाच्या सर्व त्रुटी दूर झाल्या आहेत. येथे म्हाडाचा गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचा निर्णय सोमवारी लाभार्थी व पदाधिकारी स्तरावर घेण्यात आला. त्यामुळे गत अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला हा विषय मार्गी लागणार आहे.

आमदार रणजितसिंह मोहिते, भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते आणि माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते आणि ग्रामस्थांची विशेष बैठक झाली. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते, तहसीलदार जगदीश निंबाळकर यांची उपस्थिती होती. अकलूजमधील लाभार्थ्यांची मते मोहिते बंधूंनी जाणून घेतली. ग्रामस्थ घेतली त्या निर्णयाची अंमलबजावणी होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या संदर्भात त्यांनी अनेक पर्याय ग्रामस्थांसमोर ठेवले. या गावठाणात म्हाडाचा निवास प्रकल्प राबवावा, असे ग्रामस्थांनी एकमुखी सांगितले. त्यानंतर तसा प्रकल्प राबवण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले.

ग्रामस्थांसमोर ठेवले हे पर्याय : मिळणारी जागा आता तुमच्या मालकीची आहे. त्यासंदर्भात तुम्ही स्वतः घर बांधू शकता किंवा म्हाडाकडे निवास सोसायटी नोंदवून त्या अंतर्गत निवास योजना राबवू शकता, असा पर्याय आमदार रणजितसिंह मोहिते यांनी ग्रामस्थांसमोर ठेवला. प्रत्येक लाभार्थ्याला घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये मिळणार आहेत. म्हाडा अंतर्गत निवास योजना राबवली तर त्यात आणखी सुखसोयी उपलब्ध करता येतील. या सदर्भातील सर्व निर्णय तुमच्यावर आहे. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आम्ही करू, असे आमदार रणजितसिंह मोहिते यांनी म्हटले. त्यावर उपस्थित लाभार्थ्यांनी हात वर करून तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, असे ठामपणे सांगितले. त्यानंतर म्हाडाचा निर्णय जाहीर करण्यात आला.

मृतांच्या वारसांना लाभ
२०१६ मध्ये मी सरपंच असताना तत्कालीन मंत्री विजयसिंह मोहिते यांनी माझ्यावर अकलूज संदर्भात चार महत्त्वपूर्ण कामे सोपवली होती. त्यामध्ये अकलूजचे गावठाण, नवीन पाणीपुरवठा योजना, क्रीडा संकुल आणि बाह्यवळण रस्ता या कामांचा समावेश होता. अकलूज मधील सर्व गरजू नागरिकांना घर देण्याचे विजयसिंह यांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण होणार असल्याचे धैर्यशील म्हणाले. लाभार्थीचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या एका वारसाला या योजनेचा लाभ होणार असल्याचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...