आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासकांकडून जोरदार बॅटिंग:सोलापूर मनपा प्रशासकाचा निर्णय; केंगावच्या येथील 47 एकर जागेत पिकनिक स्पॉट

सोलापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेत 6 मार्चपासून प्रशासक आले या तीन महिन्यात तीनवेळा प्रशासकीय ठरावावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. यात 125 पेक्षा जास्त प्रस्तावावर चर्चा करुन निर्णय घेण्यात आला. तुळजापूर रोडवरील कचरा डेपो परिसरात 200 मीटर अंतर बफर झोन जाहीर करण्यास मान्यता देण्यात आले. केंगाव येथील 47 एकरांच्या जागेवर वृक्ष लागवड करण्यात आले. तेथे पिकनिक स्पॉट करण्यासाठी 14.20 कोटींच्या कामास मंजूरी देण्यात आली. पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक झाली. त्यात निर्णय घेण्यात आला.

महापालिकेतील भाजपाचे कारभार संपल्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे प्रशासकीय कारभार आला. त्यानंतर पालिकेत कार्यालयासह अनेक कामात बदल झाले. आतापर्यंत 125 पेक्षा जास्त प्रस्ताववर निर्णय घेण्यात आले. त्यात अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती, नगरोत्थान योजना, भांडवली कामे, जिल्हा नियोजन समितीची अनुदान, शासकीय अनुदान आदी निधीबाबत निर्णय घेण्यात आले.

केंगाव येथे 47 एकर जागा आरक्षीत असून, तेथे महापालिकेने दहा हजारपेक्षा जास्त वृक्ष लागवड केले. भविष्यात त्यांची निकड लक्षात घेता तेथे पिकनिक स्पॉट करण्याचा मानस आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी 14 कोटी 20 लाख 47 हजार 203 रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आले.

भोंगाव कचरा डेपो परिसरात 200 मीटर अंतरावर बफर झोन जाहिर करण्यात आले. यास मान्यता देण्यात आली. यासाठी समिती सदस्य तथा अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, तत्कालीन मुख्यलेखापार शिरीष धनवे, नगर अभियंता संदीप कारंजे, नगरसचिव प्रविण दंतकाळे यांची बैठक 25 मार्च रोजी झाली. त्यात केंगाव व भोगाव येथील विकास कामाबाबत निर्णय घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...