आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:सोलापूरच्या रॉयल इंडस्ट्रीयल सर्व्हिसला दिल्ली येथील पुरस्कार; औद्योगिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवा पुरस्कार

उत्तर सोलापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली येथील एशिया इनिसेटिव्ह व नॅशनल अचिव्हर रिकॅनेशन फोरमचा पुरस्कार सोलापूरच्या रॉयल इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसला देण्यात आला .औद्योगिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवा पुरवल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. गत पंधरवड्यात दिल्ली येथे हे पुरस्कार देण्यात आले .

एशिया इनिसेटिव्ह या संस्थेच्या वतीने देण्यात आलेला आयकॉनिक इंडियन अवाॅर्ड २०२२ हा पुरस्कार अभिनेत्री व माजी खासदार जयाप्रदा व भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू तर व नॅशनल अचिव्हर रिकॅनेशन फोरमचा पुरस्कार दिल्ली विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांच्या हस्ते देण्यात आला. कंपनीचे सीईओ संजय सोमवंशी यांनी स्वीकारला. या यशाबद्दल सोलापुरातील औद्योगिक क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...