आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादीड दिवस शाळा शिकलेले अन् ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नव्हे तर श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे, अशा शब्दांत सत्य मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समारोपनिमित्त शहरात रविवारी भर पावसात अनुयायांनी सवाद्य मिरवणुका काढून त्यांच्या विचारांचा जयजयकार केला.
जल्लोष पूर्ण वातावरणात, एकापेक्षा एक आकर्षक देखावे, पारंपरिक वाद्य, डॉल्बीवर तरुणाई थिरकली. यंदाच्या वर्षी मंडळांची संख्या वाढून ती ३० हून अधिक झाली. पावसाची तमा न बाळगता दुपारी दोन वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला. पाच वाजण्याच्या सुमारास भय्या चौकात ही मंडळी आल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून निवडणुकीस प्रारंभ झाला. भैया चौक, रामलाल चौक, डॉ. आंबेडकर चौक, सरस्वती चौक, मेकॅनिकी चौक, मार्गे शिवाजी चौकात मिरवणुकीची सांगता केली. या मिरवणुकीत हजारो स्त्री, पुरुष सहभागी होते. यावेळी माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, दलित स्वयंसेवक संघाचे विजय पोटफोडे, मध्यवर्ती समितीचे राजू महादेव क्षीरसागर, विशाल लोंढे, युवराज पवार, आरपीआय महिला राज्य उपाध्यक्ष संघमित्रा गायकवाड, लहुजी शक्ती सेना विष्णू कसबे, माकपचे नरसय्या आडम आदी उपस्थित होते.
देखावे ठरले आकर्षण: एसएस ग्रुपने गेट ऑफ इंडिया तर मुक्ता साळवे युवा मंडळाने माझा रशियाचा प्रवास ही चित्रकृती, लोकसाहित्य संस्थेच्या वतीने व्हाइट हॉर्स विहार, आरसी ग्रुपच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यात तडवळे (क) या ठिकाणी १९४१ साली झालेल्या महार मांग वतनदार परिषद अधिवेशनाचा देखावा सादर केला होता.
या मंडळांचा होता सहभाग
धम्मदीप मंडळ मुरारजी पेठ, लोकशाहीर संस्था विजापूर रोड, अण्णाभाऊ संस्था कुमठा नाका, जुना बोरामणी नाका सामाजिक संस्था, स्वराज कला मंडळ रविवार पेठ, मातंग समाज युवक संघटना पाथरुट चौक, जी.के. निराळी वस्ती, नवरंग, वारणेचा वाघ, सावधान मंडळ, एम.के मित्र परिवार, संघर्ष युवा, एनआर व एस.एस.ग्रुप, दलित स्वयंसेवक संघ, लहुजी शक्ती सेना,आर.सी ग्रुप आदी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.