आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुजी झाले त्रस्त:अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेईनात शाळा; शिक्षक महासंघाचे शिक्षणाधिकाऱ्यांना साकडे

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागच्या महिन्यात अतिरिक्त ठरलेल्या खासगी प्राथमिकच्या अल्पसंख्याक शाळा वगळून इतर शिक्षकांचे ऑनलाइनद्वारे समुपदेशन प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले. मात्र, जिल्ह्यातील काही शाळा शिक्षकांना रुजू करून घेत नाहीत. याबाबत तक्रारी शिक्षक संघटनांकडे प्राप्त झालेल्या आहेत. यासह विविध शिक्षकांच्या समस्यांचा पाढा शिक्षक महासंघाने प्राथमिक शिक्षणाधिकारी व महापालिका प्रशासनाधिकाऱ्यांपुढे निवेदन देत मांडला.

खासगी प्राथमिक शाळांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या विविध विषयावर चर्चा करण्यासाठी शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी आणि वेतन पथक अधीक्षक यांच्याकडे लवकरच सहविचार सभा होणार आहे. तरी ज्या शाळांचे,ज्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असतील त्यांनी शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज देण्याचे आवाहान जिल्हाअध्यक्ष कल्लप्पा फुलारी आणि विश्वजीत माणिकशेट्टी यांनी केले आहे.

अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून न घेणार्‍या शाळांच्या वेतनाबाबत, बीएलओ कामातून शिक्षकांची मुक्तता, शालेय पोषण आहाराबाबत, 2022-23 चे सेवक संच शिबिर घेऊन शाळाना देण्यात यावे, आरटीई मान्यतेबाबत, आपले गुरुजी शासन निर्णय रद्द करा, अर्जित रजेचे रोखीकरण फरक बिले, वैद्यकीय देयके, दरमहा एक तारखेला वेतन होणेबाबत आदी विषय पत्रिकांचे निवेदन देऊन सहविचार सभेची तारीख, वेळ मागितली. लवकरच सहविचारसभेसाठी तारीख देण्याबाबत प्रशासनाधिकारी संजय जावीर यांनी पदाधिकार्‍यांना आश्वस्त केले. यावेळी कृष्णा हिरेमठ, राजश्री तडकासे, राजूदास पवार, महानंदा सोलापुरे,सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...