आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Demand For Immediate Availability Of Ambulance To University Health Centre; Health Minister Dr. Statement Given To Tanaji Sawant| Marathi News

मागणी:विद्यापीठ आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी; आरोग्य मंत्री डाॅ. तानाजी सावंत यांना दिले निवेदन

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात राज्यात करोनाची मोठ्या प्रमाणात लाट होती.परंतु करोनाकाळातही विद्यापीठाकङे स्वतःची रुग्णवाहिका नव्हती. प्रत्यक्ष शिक्षण सुरू झाल्याने विद्यार्थीच्या आरोग्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ङाॅ. तानाजी सावंत यांची समक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.

यावेळी शहर प्रमुख मनोज शेजवाल जिल्हाप्रमुख अमोल शिंदे उपस्थित होते. कर्मचारी आणि विद्यार्थी याच्या आरोग्यासाठी विद्यापीठात पूर्ण वेळ ङाॅक्टर असून विद्यापीठात स्वतंंत्र आरोग्य केंद्र असले तरी तेथे सुविधांचा अभाव आहे.आरोग्य सुविधांबाबतची हेळसांड अनेक वेळा विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली त्यावर खर्च करण्याची मानसिकता प्रशासनाची नाही.सध्याच्या परिस्थितीत कोणाला कसला आजार समोर येईल,याची कोणालाच कल्पना नसते. मात्र कोणतीही आपातकालीन घटना उद्धभवल्यानंतर अशावेळी तात्काळ रूग्णवाहिकेची आवश्यकता असते.विद्यार्थी व कर्मचाऱी याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तात्काळत विद्यापीठास स्वतंंत्र अद्ययावत रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासंदर्भात संबंधितांना आदेश द्यावेत असे निवेदन सादर करताना प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी सांगितले. यावेळी ऋषिकेश माळशिकरे,रविकांत बनसोङे,मुकेश सोनवणे,विकास नागटिळक, आदी उपस्थित होते.

आपत्कालीन घटना घडल्यास रुग्णवाहिका आवश्यक
विद्यापीठात आरोग्याच्या दृष्टीने विद्यापीठात कोणत्याही सोई-सुविधा नाहीत.शहरापासून १२ कि.मी अंतरावर विद्यापीठ आहे. एखादी घटना घडल्यास तातङीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी जवळपास हाॅस्पिटल उपलब्ध नाही.अशा वेळी विद्यापीठातून शहरातील हाॅस्पिटलमध्ये जाण्याकरिता रुग्णवाहिका असणे अत्यंत आवश्यक आहे.
सचिन शिंदे, अध्यक्ष , प्रयास मागासवर्गीय संस्था, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...