आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा‎ दाखल:संस्ममरण उद्यान प्रकरण मिटवून‎ घेण्यासाठी 50  लाखांची मागणी‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर सदर बजार परिसरातील महापालिकेच्या‎ मालकीचे संस्मरण उद्यान भाडे करारपत्रात अडथळा‎ आणून नंतर प्रकरण मिटवून घेतो असे सांगून पन्नास‎ लाखांची मागणी केल्याची फिर्याद शौकत पठाण यांनी‎ दाखल केली. यावरून अस्लम मुन्शी आणि सैपन‎ शेख या दोघांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.‎

शौकत पठाण यांनी शिवरत्न क्रीडा शिक्षण मंडळ‎ या संस्थेच्या नावाने २८ जुलै २०१५ रोजी संस्मरण‎ उद्यान मनपाकडून ३ वर्षे ११ महिन्याच्या‎ कालावधीकरिता लिव्ह अँड लायसन्स भाडे करारपत्र‎ करून घेतले. २१ नोव्हेंबर २०१९ रोजी भाडे करार पत्र‎ संपुष्टात आले. त्यानंतर नव्याने भाडे करार पत्र करून‎ घेण्याचे काम सुरू झाले.

बातम्या आणखी आहेत...