आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह:बदनामीची धमकी देत महिलेस खंडणीची मागणी ; खंडणी मागितल्याचा गुन्हा

बार्शीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुक अकाउंटवरून आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट करून बदनामी करू. बदनामी नको असेल तर दोन लाख रुपये दे नाही तर फेक अकाउंटवरून बदनामी करू, अशी धमकी देऊन दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार बार्शीत उघडकीस आला. याप्रकरणी बार्शी शहर पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेच्या फिर्यादीनंतर संशयित आरोपी शुभम उंडाळे, उमेश नेवाळे (दोघे रा. बार्शी) यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची माहिती अशी : फिर्यादी या राजकीय पदावर राहून सामाजिक कार्य करतात. ५ मार्च व ८ मार्च २०२२ रोजी ‘बार्शीचे खंडणीवाले’ या फेसबुक अकाउंटवरून फिर्यादीविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यात आला होता. संबंधित फेसबुक अकाउंट कोण चालवत आहे हे माहिती नसल्याने पीडिता याबाबत चौकशी करत होत्या. सोमवारी ५ सप्टेंबर रोजी त्या कामानिमित्त कोर्टाकडे गेल्या होत्या. त्यावेळी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास त्या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाकडे जात असताना दत्त कँटीनसमोर शुभम उंडाळे थांबलेला होता. त्यावेळी शुभम उंडाळे याने फिर्यादीचा पाठलाग करून त्यांना वाटेत अडवले. रणवीरने गुन्हा दाखल करून आमचं काय वाकड केलं. यापुढे मी, उमेश नेवाळे व आमचे इतर सहकारी मिळून तुझी अशीच बदनामी करणार. तुझं राजकारण संपवतो. तुला बदनामी नको असेल तर आम्हाला दोन लाख रुपये दे. नाही तर बार्शीचे खंडणीवाले व इतर फेक अकाउंटवरुन तुझी लाज काढतो, अशी धमकी देऊन फिर्यादीकडे दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली.

घडलेल्या प्रकारावरून ५ मार्च व ८ मार्च रोजी बार्शीचे खंडणीवाले या फेसबुक अकाउंटवरून केलेली फिर्यादीची बदनामीकारक पोस्ट शुभम उंडाळे व उमेश नेवाळे दोघे रा. बार्शी व त्यांचे इतर सहकारी यांनी केली होती अशी फिर्यादीची खात्री झाली. राजकीय वादातून चिडून जाऊन फिर्यादीची बदनामी करण्याच्या उद्देशाने संबंधितांनी फेसबुक अकाउंटवरून फिर्यादीविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर पोस्ट केला. तसेच यापुढे बदनामी नको असेल तर दोन लाख रुपये दे नाही तर फेक अकाउंटवरून तुझी लाज काढतो अशी धमकी देऊन दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली, अशा आशयाची फिर्याद दिली आहे. त्यावरून संबंधित संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...