आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरीत कडकडीत बंद:फटाके कारखाना दुघर्टनेतील आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी

पांगरी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेकायदेशीर फटका कारखान्यास आग लागून रविवारी पांगरी येथे चार कामगार महिलांचा बळी गेला. यातील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोरात- कठोर शिक्षा व्हावी, यासाठी नागरिकांनी पांगरी येथे मंगळवारी कडकडीत बंद पाळला. यात व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन निषेध नोंदवत पांगरी येथील बाजारपेठ बंद ठेवली. सकाळी शांततेत बंदला सुरुवात झाली, या बंदमध्ये रोज वर्दळीचे ठिकाण असलेल्या पांगरीतील स्टँड चौक, शिवाजी चौक, अचानक चौक येथे शांतता पसरली होती. तर रोजच्या गजबजलेल्या रणवीर चौक, अयोध्या नगर, गोडसे गल्ली, काळे गल्ली, महाजन गल्ली, कारी चौक, भीमनगर आदी परिसरात शुकशुकाट दिसून येत होता. कुठल्याही अनुचित घडला नाही.

बातम्या आणखी आहेत...