आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांमध्ये योगाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तज्ज्ञांनी योगाचे उपयोग व माहिती सांगितली.
सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ
ज्येष्ठ नागरिक संघ व भाजप उत्तर भारतीय आघाडी यांच्यातर्फे प्रभाकर हौसिंग सोसायटी ग्राउंडवर गुरूलिंग कन्नूरकर यांच्या मार्गदर्शन खाली योग शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेते. संघाचे अध्यक्ष घनश्याम दायमा यांनी प्रास्ताविक केले. श्याम चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख आनंद खंडेलवाल, अनुपम खंडेलवाल यांनी सत्कार केला. या वेळी व्यापार आघाडीचे निवास दायमा, सुनील डागा, नंदकिशोर खंडेलवाल, सुनील खंडेलवाल उपस्थित होते. आरती खंडेलवाल यांनी आभार मानले.
वालचंद महाविद्यालय
वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स व हिराचंद नेमचंद० कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभाग, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास रुचिता वल्पा (आंतरराष्ट्रीय योगपटू) व डॉ. नवराज काळदाते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक डॉ. श्रीनिवास जगताप यांनी केले. राहुल हजारे यांनी सूत्रसंचालन, किरण चौगुले यांनी पाहुण्यांचा परिचय, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रामचंद्र गोरे यांनी आभार मानले.
स. हि. ने. प्रशाला
श्री सरस्वती मंदिर संस्थेच्या स. हि. ने. प्रशालेत आयोजित करण्यात जागतिक योग दिनाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून योग, निसर्गोपचार अभ्यासक व संमोहन तज्ज्ञ क्रांतिवीर महिंद्रकर उपस्थित होते. मुख्याध्यापिका नीता येरमाळकर यांनी प्रास्ताविक केले. सहशिक्षिका विद्या माने यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून सूत्रसंचालन केले. सुचेता पोकळे व विरेश अंगडी यांनी आभार मानले.
आनंदराव देवकते प्रशाला
वडजी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आनंदराव देवकते प्रशालेत योगाचार्य श्री. वाघमारे यांनी प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी मुख्याध्यापक श्री. गजबा यांच्यासह प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतकर कर्मचारी, पालक उपस्थित होते.
उमाबाई श्राविका विद्यालय
उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात श्राविका संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन शहा यांची प्रेरणा व प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे संस्थेच्या सीईओ देवई शहा, दीप्ती शहा यांच्या मार्गदर्शनाखाली योगा दिवस पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा योग परिषदेच्या अध्यक्ष स्नेहल पेंडसे उपस्थित होत्या. पर्यवेक्षक पौळ यांनी योगा दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित यांनी अतिथींचा सत्कार केला. क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे यांना योगा दिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन वरिष्ठांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रशालेतील सहशिक्षक पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय महाडिक यांनी करून दिला. कस्तुरे यांनी आभार मानले.
जिल्हा परिषद
जिल्हा परिषद सोलापूर प्रशासनातर्फे आयुष कक्ष आरोग्य विभाग आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या समन्वयाने जिल्हा परिषद आवार येथे योग दिन योग अभ्यासाने पार पडला. सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, महिला व बालकल्याण अधिकारी जावेद शेख, आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे आदी उपस्थित होते. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या तनुजा शिंदे, वृषाली पाटील यांनी ध्यान व संकल्पनांची मांडणी केली. विवेक लिंगराज यांनी प्रास्तविक केले. ५२७ आरोग्य संस्था तथा आरोग्यवर्धिनी केंद्र आणि सर्व शाळा तसेच पंचायत समिती स्तरावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. विस्तार अधिकारी रफिक शेख यांनी समन्वय केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.