आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा:प्रवासी सुरक्षेसाठी 28 रेल्वेगाड्यांमध्ये अत्याधुनिक शस्त्रांसह आरपीएफ तैनात, रेल्वेतर्फे स्टार्ट जवान हा उपक्रम राबवण्याचा निर्णय

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील दुर्गम आणि सतत पडणाऱ्या दरोड्याच्या भागात रेल्वेतर्फे स्टार्ट जवान हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाचे अत्याधुनिक शस्त्रास्त्राने सज्ज असलेले जवान दौंड ते सोलापूर मार्गावर धावणाऱ्या २८ रेल्वेमधून तैनात करण्यात आले आहेत. दौंड ते कुर्डुवाडीपर्यंत ४० आणि कुर्डुवाडी ते सोलापूरदरम्यान २० जवान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. या उपक्रमात रेल्वे प्रवासी महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. रेल्वेत घडणाऱ्या चोरीच्या घटना व गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न आहे. याबाबत आयुक्त डॉ. चिंचवाडे यांनी प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार देशात अनेक कोंबिंग ऑपरेशनमध्ये सहभागी असणाऱ्या या बलशाली आणि शस्त्रधारी जवानांची नेमणूक करण्यात आली आहे. जिंती, पारेवाडी हा भाग संपूर्णपणे दरोडा मुक्त करण्यासाठी या जवानांची मदत होणार आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष बल दाखल
रेल्वे सुरक्षा विशेष बलच्या १२ बटालियनची एक तुकडी दौंड येथे दाखल झाली आहे. या तुकडीचा एक भाग सोलापूर येथेही देण्यात आलेला आहे. या तुकडीवर दौंड ते सोलापूर मार्गावरील प्रवासी रेल्वे गाड्यांच्या सुरेक्षाची विशेष जबाबदारी दिली आहे. या तुकडीचे जवान आधुनिक शस्त्रांसह मार्गरक्षी दलाच्या रूपाने प्रवासी ट्रेनमध्ये कार्यरत असणार आहेत. रेल्वे सुरक्षा विशेष बल सहयोगाने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रात्रीच्या वेळी २८ गाड्यांमध्ये मार्गरक्षी दल तैनात केले आहे. '' डॉ. श्रेयांश चिंचवाडे, रेल्वे सुरक्षा बल, आयुक्त, सोलापूर

महिलांना त्वरित मदत :
महिलांना कोणी अनोळखी व्यक्ती त्रास देत असेल किंवा त्यांचा पाठलाग करत असेल तर रात्रीच्या प्रवासात त्यांच्याकडे वेडेवाकडे पाहणे किंवा बोलणे अशा काही तक्रारी असतील तर या महिला या शस्त्रधारी पोलिसांकडे ताबडतोब तक्रार करू शकणार आहेत. त्यातून अनुचित प्रकारावर आळा बसण्याची तजवीज या शस्त्रधारी जवानांकडून केली जाणार आहे. यातील काही पोलिस रेल्वेत आणि काही पोलिस फलाटावर उभे असणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...