आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिकी वारी यात्रेनिमित्त:‘ज्ञानदेव...तुकाराम’च्या जयघोषात उपमुख्यमंत्री फडणवीसांनी धरला फेर

पंढरपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी कार्तिकी वारी यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी फडणवीस यांचे गुरुवारी सायंकाळी पंढरीत आगमन झाले. या वेळी विश्रामगृहात वारकऱ्यांच्या एका दिंडीच्या चोपदारासमवेत उपमुख्यमंत्री फडणवीस यानी ‘ज्ञानदेव...तुकाराम...’च्या जयघोषात उत्साहात फुगडी खेळत फेर धरला. अमृता फडणवीस यांनीही खेळली फुगडी : पंढरपूर येथे कार्तिकी वारी यात्रेच्या शासकीय महापूजेनिमित्त देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे आगमन झाले आहे. या वेळी पंढरपूर विश्रामगृहात वारकऱ्यांच्या एका दिंडीतील महिला वारकऱ्यांसोबत अमृता फडणवीस यांनी फुगडी खेळत फेर धरला.

बातम्या आणखी आहेत...