आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाहसी पोलिसी खाक्याबरोबर पोलिस जर जनसेवक झाला तर त्याला जनतेकडून सर्वाधिक आदर आणि आनंद मिळतो. अशोक कामटे यांची सेवा सोलापूरकरांसाठी कायम अविस्मरणीय ठरली, असे गौरवोद्गार पोलिस उपायुक्त दीपक आरवे यांनी काढले.
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, "पोलीस खात्यातील माझे अनुभव"या विषयी ते बोलत होते. सुरुवातीला अध्यक्ष डॉ. विजय देगावकर यांनी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. निहार बुरटे यांनी रोटरी सदस्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. मधुरा वडापुरकर यांनी करून दिला.
महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरात घेतलेल्या दीपक आरवे यांना खाकी वर्दीचे आकर्षण होते. प्राध्यापक आणि पोलिस खात्यातील नोकरी एकाच वेळी मिळाली. देशप्रेम आणि खाकी वर्दीमुळे, पोलिस सेवेची निवड केली असे त्यांनी सांगितले. ही निवड अभिमानास्पद ठरल्याचेही ते म्हणाले. पोलिस सेवेतील पहिली नेमणूक गडचिरोलीच्या नक्षल भागात झाली. साहस, कल्पकता आणि जनतेला विश्वासात घेऊन काम केल्याने तेथील मोहीम यशस्वी करू शकलो.
जनतेचे आम्ही पोलिस 'मित्र' झालो. दरोडेखोरांनी अपहरण केलेल्या बसला पोलिसांनी घेरले. दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले. ही घटना लोणावळ्यात रात्रभर फिरून पहाटे तीन चोरांना पकडले, रात्रीत छडा लावल्याने प्रवासी खुश आणि पोलिस खात्याकडून पाच हजार रुपयांचे बक्षीस ही मिळाले, असे अनेक आव्हानात्मक प्रसंग, आलेले अनुभव त्यानी खुलवून सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.