आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीचा माेर्चा साेमवारी हाेम मैदानावर धडकला आणि त्यानंतर नेत्यांची भाषणे सुरू झाली. कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत नेत्यांनी त्यांना िचमणीचे राजकारण करून त्रास देणाऱ्याचे नाव घेण्यास सांगितले. त्याला उत्तर देताना श्री. काडादी यांनी नाव घेतले नाही. परंतु त्यांच्या बाेलण्यातला राेख मात्र आमदार विजयकुमार देशमुख आणि कारखान्याचे माजी तज्ञ संचालक संजय थाेबडे यांच्याकडे हाेता. ‘त्यांचा’ (श्री. देशमुख) मंत्रिमंडळात समावेश झाल्यापासून हिणकस राजकारणाला सुरुवात झाली.
माझ्या व्याह्यांशी (कर्नाटकातील माजी मंत्री) बोलून ‘त्यांना’ मंत्रिमंडळात घेण्यासाठी शिफारस केली होती, असा गौप्यस्फोटही श्री. काडादी यांनी केला. कारखाना, सिद्धेश्वर मंदिर, शिक्षण संस्था या सर्वांना नाेटिसा देणे, दंड आकारणे, गुन्हे दाखल करणे असले हे ‘त्यांचे’ राजकारण असल्याचे सांगत, आता नेतृत्व बदलाची वेळ आली, असेही म्हणाले.
प्रशासनाने कारखान्यावरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी घेऊन कुमठे येथील कारखान्यापासून माेर्चाला सुरुवात झाली. त्यात सभासद, कर्मचारी यांच्यासह नेतेमंडळी सहभागी झाली. तिथून तो हाेम मैदानात आला आणि तिथे त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. दुपारी दीडला चटके देणाऱ्या उन्हात लाेक बसले हाेते. चारपर्यंत नेत्यांची भाषणे सुरू हाेती.
काेण काय म्हणाले....
गळीत हंगाम सुरू झाला, की चिमणी म्हणून आेरड सुरू हाेते. ती म्हणजे तुमच्या बापाची संपत्ती आहे का? बाेरामणी विमानतळासाठी भूसंपादन झालेले आहे. त्यासाठी प्रयत्न करा.’’-सिद्रामप्पा पाटील, माजी आमदार
शेतकरी घाम गाळताे म्हणून अन्न मिळते. कारखान्याची चिमणी पाडणे म्हणजे त्याच्या घामावरच घाला आहे. विमानसेवाच हवीय तर बाेरामणीला जा. तुमचंही भलं हाेईल अन् आमचंही...’’-शिवशरण पाटील, माजी आमदार
चिमणी पाडा म्हणण्यामागे नक्की काेण आहे, हे हुडका. काडादी कुटुंबाकडे नेतृत्व असेपर्यंत चिमणीला धक्का लागणार नाही. बाेरामणीचे विमानतळ अदानींना देऊन विकसित करावे.’’-दिलीप माने, माजी आमदार
चिमणी पाडण्याचा प्रस्ताव महापालिका सभेत आला हाेता. भाजपचे मनाेज शेजवाल यांनी त्याला विराेध केला. परंतु पक्षनेते शिवानंद पाटलांनी त्यांना बसवले. भाजपने त्याचा ठराव केला.’’ -चेतन नराेटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.