आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवदासी-विधवा, गरीब महिलांसाठी आरोग्य गट संकल्पना:स्वस्ति व क्रांती संघटना देणार सेवा, 3 लाख महिलांपर्यंत पोहोचणार

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वस्ति फाउंडेशन बेंगलोर आणि देह विक्रय महिलांची क्रांती संघटना या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने वंचित आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या महिलांसाठी आरोग्य गट ही नवीन संकल्पना राबविण्यात येणार आहे. या आरोग्य गटाच्या माध्यमातून 10 महत्त्वपूर्ण अशा आजारांवर उपचार करण्यासाठी आणि तपासणी करण्याकरीता हा गट काम करणार आहे.

या आरोग्य गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेने महिण्याकाठी दोनशे रुपये आपल्या आरोग्याच्या तपासणीसाठी आणि उपचारासाठी तरतूद करून ठेवायचे आहे. त्याकरिता फाउंडेशन त्यांना मदत करणार आहे. त्यानंतर जेव्हा त्यांना हवे त्यावेळी त्या या रक्कम व्याजासहित पुन्हा काढून घेऊ शकणार आहेत. यासाठी संपूर्ण प्रणाली बँकेप्रमाणे केली जाणार असून महिलांना आरोग्याची तरतूद करण्यासाठी हातोहात केली जाणारी ही एक वेगळी मदत असणार आहे.

900 महिलांची नोंदणी

याकरिता जवळपास 900 महिलांनी विविध क्षेत्रातून आपली नाव नोंदणी केली आहे. यात रक्तदाब मधुमेह थायरॉईड, नियमित दातांची तपासणी, त्वचेची तपासणी यासारख्या दहा आजारांचा समावेश करण्यात आला आहे.

3 लाखाहून अधिक महिलांना सेवा

स्वस्तिसंस्थेच्या माध्यमातून तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये आरोग्य गटाचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत या चार राज्यांमध्ये तीन लाखाहून अधिक महिलांपर्यंत या संस्थेने आरोग्य सेवा पोहोचवली आहे. सोलापूर शहरात ही संस्था कार्यान्वित झाली असून 900 महिलांची नियमित तपासणी नुकतीच वेगवेगळ्या विभागात करण्यात आली आहे.

देवदासी विधवा, गोरगरीब महिलांचा समावेश

इंदिरानगर, नई जिंदगी, तरटी नाका परिसर, क्रांती कार्यालय अशा अनेक ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेत देहविक्री करणाऱ्या महिलांव्यतिरिक्त देवदासी विधवा, गोरगरीब महिला दारिद्र्यरेषेखालील महिला आणि कामगार व संघटित महिलांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत कष्टकरी महिला कोणत्याही ठिकाणाहून शहरांतर्गत आपली नोंदणी करू शकतात.

कोरोना काळात मदत

कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता असताना ऑक्सिजनच्या संदर्भातील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याच्या प्रस्तावावर विचार करत वस्ती फाउंडेशनने आपल्या जवळील अकरा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हा सर्वोपचार होणालयाला भेट दिले होते अशा विविध माध्यमातून आरोग्याच्या सेवेत ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आता सामान्य महिलांच्या आरोग्याची तरतूद करण्यासाठी हा अनोखा उपक्रम महाराष्ट्रात सुरू केला असून सोलापुरात याची सुरुवात झाली आहे. अशी माहिती क्रांती संघटना प्रमुख रेणुका जाधव यांनी दिली

बातम्या आणखी आहेत...