आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी सांगितलं होतं मी पुन्हा येईन:मविआचा करेक्ट कार्यक्रम केला आणि तुमच्या आशीर्वादाने सरकार आले, देवेंद्र फडणवीसांचा टोला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मी सांगितलं होतं मी पुन्हा येईन. 106 वा आमदार द्या करेक्ट कार्यक्रम आम्ही करतो, असे म्हटलो होतो. बोलल्याप्रमाणे आम्ही मविआचा करेक्ट कार्यक्रम केला आणि तुमच्या आशीर्वादाने, पांडुरंगाच्या आशीर्वादाने सरकार आले, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआला टोला लगावला. सोलापूरच्या मंगळवेढ्या आवताडे शुगर्स प्रथम गळीत हंगाम शुभारंभ व शेतकरी मेळाव्यात ते बोलते होते.

सुधाकर परिचारक हे निवडणुकीला उभे होते आणि त्यावेळी मी एक सभा घेण्यासाठी आलो होतो. 24 गावांना पाणी देणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजना ही मी करणार, असे त्या सभेत आश्वासन दिले. ते आश्वासन दिल्यानंतर सरकार गेलं. पण मी सांगितलो होतो मी पुन्हा येईन आणि तुमची योजनाही मी पुन्हा येण्याची वाट पाहत बसली. मधल्या सरकारने फाईल सरकरवलीही नाही. पुन्हा तुमच्या आशीर्वादाने तुम्ही समाधान दादांना निवडून दिले. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे सांगितले होते की 106 वा आमदार द्या करेक्ट कार्यक्रम आम्ही करतो. आम्ही करेक्ट कार्यक्रम केला आणि तुमच्या आशीर्वादाने, पांडुरंगाच्या आशीर्वादाने सरकार आलं. सरकार आल्याबरोबर आपण या योजनेला मोठ्याप्रमाणात गती दिली, असे फडणवीस म्हणाले.

गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा, असे साकडे विठ्ठलाच्या चरणी घातल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला.
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला.

लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही

पुढे ते म्हणाले की, मागच्या सरकारने अडीच वर्षांपूर्वी घोषणा केली होती. जो प्रामाणिकपणे कर्ज भरतो. त्या शेतकऱ्याला आपण 50 हजार रुपये कर्ज देऊ. त्यांनी घोषणा केली विसरून गेले. आपल्याकडे एक म्हण आहे. मी कोणाला लबाड वैगेरे म्हणत नाही. पण, म्हण आहे की, लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही. ती अवस्था होती. कमीतकमी पाच विधानसभेच्या अधिवेशनात आम्ही विरोधी पक्ष म्हणून विचारायचो. 50 हजार रुपयांची शेतकऱ्यांसाठी घोषणा केली होती. ती कधी देणार. कुठही गेले की शेतकरी आम्हाला विचारतात. तेव्हा आम्हाचा बस आता पुढच्या अधिवेशनात देऊ, असे आश्वासन मिळायचे.

हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार

पांडुरंगाची इच्छा होती. हे पैसे आमच्याच हातून दिले गेले पाहिजे होते. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही निर्णय केला. एका क्लिकने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले. आपले सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे, असे म्हणत त्यांनी मविआ सरकारवर टीका केली.

शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण
पुढे त्यांनी सांगितले की, मागच्या काळात गुजरातच्या राज्यपालांना पुण्याला बोलावले होते. सुमारे दहा हजार शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम केला. यात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण दिले. खतांचे भाव वाढले आहेत. औषधांचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्याच्या उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. तो कमी करण्यासाठी हा प्रयत्न केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...