आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खोचक टोला:'देवेंद्र फडणवीसांनी बिहारवरुन दिल्लीला जावं, निदान पंतप्रधान मोदी तरी बाहेर पडतील'- उद्धव ठाकरे

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'देवेंद्र फडणवीस बिहारला गेलाच आहात तर पुढे दिल्ली जा, निदान पंतप्रधान मोदी तरी बाहेर पडतील', असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. उद्धव ठाकरे यांनी सोलापूरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी शेतकऱ्यांना राज्य सरकार मदतनिधी जाहीर करत नसल्याचा आरोप भाजप करत आहे, असा सवाल विचारला असता, उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, 'राजकीय चिखलफेक करण्याची गरज नाही. सध्या महाराष्ट्रावर मोठे संकट कोसळले आहे. पण, विरोधी पक्ष नेते हे बिहारला प्रचाराला जात आहेत. देवेंद्र फडणवीस बिहारला प्रचाराला गेला आहात, आता पुढे दिल्लीला जा, निदान पंतप्रधान मोदीतरी बाहेर पडतील', असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

ठाकरे पुढे म्हणाले की, 'तुम्ही राज्याचे जबाबदार राजकारणी आहे. जनतेला दिलासा देण्याची वेळ आहे. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा जर स्वत:चे राज्य हे अडचणीत असेल तर राज्यासोबत एकत्र येऊन केंद्राकडून मदतीसाठी मागणी केली पाहिजे. केंद्र सरकार हे काही परदेशातील सरकार नाही. पक्षपात न करता सर्व राज्यांना मदत करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारवर आहे. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी माझ्याशी बोलले आहे. त्यामुळे काही मदत लागल्यास हक्काने मागणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.