आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकरी संप्रदाय युवा मंचचे भाेसले यांच्या भावना:...पंढरीला परदेशातूनही येतील भक्त

साेलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाेटगी रस्त्यावरील विमानतळातून नागरी सेवेला सुरुवात झाली तर परदेशातील भक्तांची माेठी साेय हाेईल. पर्यटनाला चालना मिळेल, अशा भावना वारकरी संप्रदाय युवा मंचचे प्रदेश अध्यक्ष अक्षय महाराज भाेसले यांनी येथे मांडल्या.विमानसेवेसाठी सुरू असलेल्या चक्री उपाेषण स्थळी भेट देऊन त्यांनी पाठिंबा जाहीर केला. साेलापूर विकास मंचच्या पाठीशी वारकरी मंडळी असतील, अशी ग्वाही दिली. त्यांच्याशिवाय शेखर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या महाएनजीओ फेडरेशननेही पाठिंबा जाहीर केला. उद्योगधंदे, बहुराष्ट्रीय आस्थापने यासाठी विमानसेवा आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. त्यांच्या समवेत फेडरेशन संचालक अमोल उंबरजे हेही हाेते.

बातम्या आणखी आहेत...