आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी रंगभूमी दिन:रंगीत तालमीतून रंगभूमीची भक्ती;‎ सिनेकलावंतामुळे वाढला उत्साह‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रंगभूमी दिनाचे औचित्य साधून अखिल‎ भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर‎ शाखा आणि अखिल भारतीय मराठी‎ नाट्य परिषद उपनगरीय शाखा यांनी‎ सोलापूर शहरातील ज्येष्ठ कलावंत‎ आणि बाल कलावंतांचा सन्मान करून‎ रंगभूमी दिन साजरा केला. तर विविध‎ नाट्य संस्थांनी रंगभूमी दिनानिमित्त‎ नटेश्वरांचे पूजन करून राज्य नाट्य‎ स्पर्धांच्या तालमींच्या निमित्ताने रंगभूमीची‎ सेवा करून भक्ती वाहिली.‎ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद‎ उपनगरीय शाखेच्या वतीने मराठी रंगभूमी‎ दिनानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिर येथे‎ नटराज पूजन ज्येष्ठ अभिनेते मंगेश‎ कदम,अभिनेत्री लीना भागवत, केतकी पालव, रोहन गुजर यांच्या हस्ते करण्यात ‎ ‎ आले.

यावेळी विजय दादा साळुंके,‎ दिनेश शिंदे, आनंद खरबस ,प्रशांत‎ बडवे, शशिकांत पाटील, मीरा शेंडगे, जयप्रकाश कुलकर्णी, प्रशांत शिंगे,‎ अश्विनी तडवळकर, सुशांत कुलकर्णी, ‎ ‎ शोभा बोल्ली, आशुतोष नाटकर,नरेंद्र‎ गंभीरे, किरण लोंढे ,शशिकांत बटाणे, ‎शिवाजी उपरे,आकाश गोरे,गफूर‎ बागवान, प्रदीप जोशी, राजा राजेशचंद्र,‎ सिकंदर शेख, प्रमिता गोरे उपस्थित होते.‎ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद‎ शाखा सोलापूरच्या वतीने //"मराठी‎ रंगभूमी दिनानिमित्त//"नाट्यक् षेत्रात‎ महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या‎ पडद्यामागील कलावंतांचा सत्कार श्री‎ सिद्धेश्वर बँकेचे व्हाइस चेअरमन नरेंद्र‎ गंभीरे यांच्या हस्ते करण्यात आला.‎

अध्यक्षस्थानी नाट्य परिषदेचे अध्यक्ष‎ प्रकाश यलगुलवार होते.‎ सूत्रसंचालन प्रा.जोतिबा काटे यांनी‎ केले. पद्माकर कुलकर्णी यांनी आभार‎ मानले. याप्रसंगी उपाध्यक्ष विठ्ठल‎ बडगंची, सहकार्यवाह सुमित‎ फुलमामडी, सुहास मार्डीकर,‎ कार्यकारिणी सदस्य आनंद खरबस,‎ व्यंकटेश रंगम, संतोष उदगिरी, अपर्णा‎ जोशी, शांता येळंबकर, प्रा. नरसिंह‎ आसादे, गुरु वठारे, आर. एस. पाटील‎ उपस्थित होते.‎

यांचा झाला सत्कार‎
ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे,‎ शशिकांत लावणीस, मल्लिकार्जुन‎ कावळे, जे.जे.कुलकर्णी, राजा‎ राजेशचंद्र, शरदकुमार एकबोटे,‎ शुकूर सय्यद, पांडुरंग चौधरी, दीपक‎ आहेरकर, रामकृष्ण अघोर यांचा‎ सन्मान करण्यात आला.

मुक्तीधाम एकांकिका सादर
‎कलाकारांच्या कार्याचा सन्मान म्हणून ज्येष्ठ‎ नाट्य कलावंत आणि मार्गदर्शकांचा सन्मान‎ नाट्य परिषदेचे स्व.पद्माकर देव सभागृह‎ मोदीखाना, सोलापूर येथे करण्यात आला.‎ यावेळी नाट्य परिषदेच्या "रंगवर्धन" या‎ उपक्रमांतर्गत दयानंद महाविद्यालयाची‎ "मुक्तीधाम" एकांकिका सादर करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...