आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर:पुढील महिन्यात होणार होता धनंजय होनमाने यांचा विवाह, त्यापूर्वीच झाले शहीद

पंढरपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक नक्षलविरोधी धाडसी कारवायांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता

भामरागड तालुक्यातील पोराईकोटी कोरपर्शी जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील क्यूआरटी पथकातील पोलिस उपनिरीक्षक धनंजय होनमाने (२६) यांना रविवारी (ता. १७) वीरमरण आले.

तानाजी होनमाने हे पुळूज येथे शेती व्यवसाय करतात. विकास आणि धनंजय होनमाने ही त्यांची दोन अपत्ये. लहानपणापासूनच धनंजय हा हुशार होता. पोलिस खात्यामध्ये भरती होऊन देशसेवा करण्याची त्याची इच्छा होती. त्यानुसार तो तीन वर्षांपूर्वी क्यूआरटी पथकात पोलिस उपनिरीक्षक पदावर भरती झाला. धाकटा भाऊ विकास उच्च शिक्षण घेत आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत धनंजय याने आपले प्राथमिक शिक्षण पुळूज येथे, पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून अकरावी आणि बारावी, महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे पूर्ण केले. त्यानंतर तो पोलिस खात्यामध्ये भरती झाला.

दरम्यान, कर्तव्यावर असताना रविवारी नक्षलवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या मृत्यूने आई,वडीलांना मोठा धक्का बसला आहे. तीनच महिन्यांपूर्वी गावातील एका मुलीशी त्यांचा साखरपुडा झाला होता. पुढच्या महिन्यात त्यांचा विवाह होणार होता, मात्र त्या अगोदरच धनंजय यांना वीरमरण आले.

पुण्यातून गडचिरोलीत बदली : होनमाने यांची २९ एप्रिल २०१५ रोजी पोलिस उपनिरीक्षक म्हणून पुण्याला नियुक्ती झाली होती. २०१७ मध्ये त्यांची गडचिरोलीला बदली झाली. अनेक नक्षलविरोधी धाडसी कारवायांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता. या कामगिरीबद्दल पोलिस महानिरीक्षकांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...