आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारधारेतून सर्वधर्मसमभाव याची शिकवण दिली. मात्र आताच्या संपूर्ण घडामोडी पाहता जातीयवाद, धर्मवाद वाढण्याची फोफावण्याची भीती वाटत आहे, असे मत देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायंकाळी महादेव ठोंबरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गौरव समितीने आयोजित केलेल्या मंथन या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन प्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर महादेव ठोंबरे व त्यांच्या पत्नी, योगिराज वाघमारे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार विधिज्ञ संजीव सदाफुले, नगरसेवक आनंद चंदनशिवे नगरसेविका संगीता जाधव जिल्हा परिषदेचे सदस्य रजनी भडकुंबे पांडुरंग चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ठोंबरे यांचे आत्मकथन वाचल्यावर त्यांनी प्रवास केला आहे तो कठीण असून अशा प्रकारचं नेतृत्व करणारी माणसं दलित चळवळीत कमी आहेत. शिवाय दलित चळवळीतून नेतृत्व पुढे येत नाही आणि आलं तर ते इतरांना मारक ठरू नये म्हणून प्रयत्न केला पाहिजे. असं व्यक्तिमत्व, असं नेतृत्व महादेव ठोंबरे यांचे असून त्यांनी वसाहत उभी केली, लोकांना मदत केली आणि आपल्या चळवळीच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार पुढे नेले. सूत्रसंचालन प्रा. ज्योती वाघमारे यांनी केले. तर आत्मकथन सारांश थिंक टँकचे प्रकाशक बाळासाहेब माघाडे यांनी घेतला.
जातनिरपेक्ष भारत तयार व्हायला २५ वर्षे लागतील
सध्याची परिस्थिती पाहिली तर जिकडे तिकडे जातीयवाद, धर्मवाद माजला आहे हे बोलण्याची वेळ येते आहे. जातनिरपेक्ष किंवा जातीव्यवस्था नष्ट होण्यासाठी भारत तयार व्हायला हवाय. तो तयार होण्यासाठी आणखी २५ वर्षे लागतील, असे मत यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. यामुळे सध्या जातीयवादाचा आणि धर्मवादाचा किती पगडा वाढला आहे याचं गांभीर्य त्यांनी स्पष्ट केलं.
वाचल्यावर त्यांनी प्रवास केला आहे तो कठीण असून अशा प्रकारचं नेतृत्व करणारी माणसं दलित चळवळीत कमी आहेत. शिवाय दलित चळवळीतून नेतृत्व पुढे येत नाही आणि आलं तर ते इतरांना मारक ठरू नये म्हणून प्रयत्न केला पाहिजे. असं व्यक्तिमत्व, असं नेतृत्व महादेव ठोंबरे यांचे असून त्यांनी वसाहत उभी केली, लोकांना मदत केली आणि आपल्या चळवळीच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार पुढे नेले. सूत्रसंचालन प्रा. ज्योती वाघमारे यांनी केले. तर आत्मकथन सारांश थिंक टँकचे प्रकाशक बाळासाहेब माघाडे यांनी घेतला.
परिस्थिती अन् माणसांमुळेच घडलो
परिस्थितीमुळे अन् माणसाच्या जाणिवेने मला उत्तम भान दिले. माणसांमुळे माणूस घडतो तसेच मी परिस्थिती अन् माणसांमुळे घडलो, असे मत यावेळी ठोंबरे यांनी व्यक्त केले. आपल्या कुटुंबीयांनी स्नेही आणि सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला प्रचंड साथ दिली. त्यांच्या प्रेमामुळेच आपण घडलो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.