आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:धर्मराज काडादी, केतन शहांचे पोलिसांना अद्याप नाही उत्तर

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी आणि उद्योजक केतन शहा यांनी सदर बझार पोलिसांत अद्यापपर्यंत खुलासा सादर केलेला नाही. सहा दिवसांपूर्वी त्यांना नोटीस देण्यात आली आहे. आठ दिवसागत त्यांनी खुलासा द्यावा, असे पोलिसांनी म्हटले होते. रविवारपर्यंत तरी खुलासा आलेला नाही, अशी माहिती सदर बझार पोलिसांनी दिली आहे.

धर्मराज काडादी यांनी पूनम गेटजवळ जाऊन केतन शहा यांना गोळ्या घालण्याची भाषा केली होती. रिव्हॉल्वर काढून धमकावले होते. यानंतर केतन शहा यांनी पोलिसांत फिर्याद दिलेली नाही. शहा यांनी सातत्याने याबाबत माहिती दिल्यामुळे पोलिसांची प्रतिमा डागाळत आहे, यामुळे आपण फिर्याद देणार की नाही हे आठ दिवसांत सांगा, अशी नोटीस केतन शहा यांना देण्यात आली आहे. रिव्हाॅल्वर परवाना रद्द का करू नये, अशी विचारणा धर्मराज काडादी यांच्याकडे नोटिसीद्वारे केली आहे. आता उर्वरित एक-दोन दिवसांत काय उत्तर देतात किंवा पोलिस पुढे काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...