आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआधुनिक युगात खडू व फळा संकल्पना आता हद्दपार होताना दिसत आहे. त्याची जागा डिजिटल फलकाने घेतली आहे. सोलापूर समाजकल्याण विभागाकडे कार्यरत असलेल्या दोन शासकीय निवासी शाळाही डिजिटल झाल्या आहेत. या शाळांनी आपल्या मुलांच्या हाती टॅब दिलेत. त्यावर ती मुलं ज्ञानाचे धडे गिरवत आहेत.
डिजिटल क्लास रुम
अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा एक मोहोळमधील पिंपरी येथे आहे, तर दुसरी शाळा अक्कलकोटमध्ये आहे. प्रत्येक शासकीय निवासी शाळेत २०० प्रमाणे एकुण मुलांसाठी ४०० टॅब उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अनुसुचित जाती उपाय योजना सन २०२०-२१ मध्ये नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत डिजिटल क्लास रुम प्रकल्प राबवण्यात आला आहे. हा प्रकल्पाचे कामही पूर्ण झाले असून डिजिटल पध्दतीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कामही सुरु झाले आहे.
वाय फायही उपलब्ध
समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षणाची आवड झाली आहे. विद्यार्थ्यांना वायफायसुध्दा उपलब्ध करुन दिले आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ९ वसतीगृह व दोन निवासी शाळा चालवण्यात येतात. निवासी शाळांनाही वायफाय सुविधा पुरवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सोलापूर शहरातील नेहरु नगर येथील २, बार्शी, माढा, कुर्डुवाडी, करमाळा, अक्कलकोटमध्ये मुला-मुलींचे वसतीगृह चालवण्यात येतात. विद्यार्थी तंत्रस्नेही होत असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होत आहे. निवासी शाळांमधील मुलं आता स्पर्धेमध्ये टिकण्यास मदत होईल.
विद्यार्थी आनंदी
या डिजिटल सुविधेबाबत अक्कलकोट निवासी शाळेतील सातवीचा विद्यार्थी करण गटकांबळे याने सांगितले की, शाळेमध्ये डिजिटल क्लासरुममध्ये डिजिटल पद्धतीद्वारे शिकवतात. शिकवत असताना व्हिडिओही दाखवला जातो. मला टॅब दिल्याने स्वत:च टॅबवरही शैक्षणिक माहिती गुगलवर सर्च करतोय. त्यामुळे शाळेत शिकायला खूप चांगले वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.