आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या लग्न समारंभाच्या सगळ्याच आवडीनिवडी बदलेल्या असून अगदी आमंत्रणा पासून शालू, मेकअप, फोटो व आहेराचे देखील स्वरूप बदलले आहे. प्रचंड पैसा खर्च करून केल्या जाणाऱ्या लग्न समारंभात काही गोष्टी मात्र साधेपणाने करण्यावरच भर दिला जात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात बस्ता हा प्रकार आता दुर्मिळ झाला आहे. वधू-वरांच्या आवडी निवडीनुसार पुण्या मुंबईत खरेदी करण्याचा ट्रेंड सध्या जास्त सुरू आहे. तर जिव्हाळ्यापासून कलाकुसरीने सजवला जाणारा रुखवताचा प्रकार हा जवळपास नावापुरता उरला आहे.
पूर्वी बैलगाडी, तुळस वेगवेगळ्या बाहुल्या, साखरेच्या डिझाइनच्या वस्तू आणि इतर गोष्टींच्या केल्या जायच्या त्या आता नामशेष होत आहेत. पूर्वी साध्या मोत्यांच्या दोन पदरी मुंडावळ्या वधू-वरासाठी असायच्या. आता २०० ते ३०० रुपये पासून अगदी हजार, दीड हजार रुपये पर्यंत अनेक प्रकारच्या कुंदनजडित, स्टोन जडीत वेगवेगळ्या प्रकारच्या मण्यांच्या मुंडावळ्या पाहायला मिळतात. पुणे, मुंबईत लग्नाचे साहित्य, कपडे खरेदीसाठी सोलापूरकर जातात. नवनवीन प्रकारचे तसेच आधुनिक स्वरुपातील साहित्यांची खरेदी तेथे होते.
मे महिन्यात एकूण १४ लग्नाच्या तारखा आहेत. यंदाही या तारखा दर वेळेपेक्षा अधिक मे महिन्यात आलेल्या आहेत. नदीकाठी, चिखलात, वाळवंटात, गवताळ भागात, डोंगर पठारावर जाऊन मंद धुंद अशा वातावरणात भावी वधू वर रेशीमगाठी बांधण्याअगोदर वेगवेगळ्या आठवणी वेगवेगळ्या फ्रेम मध्ये काबीज करण्याचा प्रयत्न प्री वेडिंग शूटिंगच्या माध्यमातून करत आहेत. वास्तविक जैन समाज आणि माहेश्वरी समाजाच्या अनेक दिग्गजांनी यावर बहिष्कार टाकला असून तशा शपथविधी घेतले आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी यास महत्व दिले जाते
पत्रिका छापण्यापेक्षा समाज माध्यमाच्या सहाय्याने व्हिडीओ पत्रिका पाठवून वेळेचा तसेच कागदाचा खर्च वाचवला जात आहे. तसेच फोन करून आमंत्रण देण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पूर्वीप्रमाणे दोन दोन तीन हजार पत्रिका छापल्या जायच्या त्याचे प्रमाण सध्या कमी झाले आहे अशी माहिती तेजस शहा या मुद्रण संचालकांनी दिली.
पुरणपोळ्या, मोदक, चटणी, भाजी, कोशिंबीर, पालक, भरलं वांग, भेंडी अशा भाज्यांना आता पुन्हा मागणी आली आहे. पुरणपोळीच्या जेवणाला अधिक मागणी असल्याचे लक्षात घेऊन अनेक लग्नांमध्ये पुरणपोळ्या आणि मोदकाचे ताट सांगितले जाते अशी माहिती केटरर्स च्या संयोजकांनी दिली. अशा ताटाची किंमत ही ३५० पासून अगदी ७५० रुपया पर्यंत किंमत आहे. तर मारवाडी, गुजराती, माहेश्वरी, सिंधी, पंजाबी या समाजामध्ये एकाच वेळी अनेक पदार्थ ठेवण्याची पद्धत आहे. पाणीपुरी ते पिझ्झा, पुरणपोळी, खव्याच्या पोळ्या, करंज्या, मंचूरियन, इडली ,डोसा असे सगळे पदार्थ एकाच वेळी ठेवले जात. मात्र असे दोन्ही प्रकार आता कमी होत आहेत. आम्हाला मुंडाआहेर केला म्हणून रुसून बसणाऱ्या अनेक मंडळींना सध्या असाच आहेर केला, तसाच आहेर केला, तुझी साडी भारी माझी साडी भारी नाही, अशी म्हणण्याची संधीच उरली नाही. कारण आहेराचे देखील रूप बदलले आहे. याची खरी पद्धत सध्या केवळ ग्रामीण भागात उरली आहे. वधू वरांना आवश्यक अशा वस्तूंचा आहेर करण्याची किंवा कलात्मक गोष्टी देण्याची पद्धत रुढ होत आहे.
पूर्वी लाजत मान खाली घालून येणारी वधू आता नवऱ्याच्या सोबत बसून ओपन एंट्री करते आहे. भरपूर फटाके, कागदी पताके आणि फुलांची उधळण करत, डोली मधून तर कुणी बुलेट वरुन तर कुणी कारमधून एंट्री करत आहेत. या कपल एन्ट्री इव्हेंटला ४० हजारांपासून ते एक लाखापर्यंत पैसे लोक मोजतात अशी माहिती कपल एंट्री स्पेशल राहुल राऊत यांनी दिली.
केवळ मंगळसूत्र सोन्याचे आणि बाकीचे इतर सर्व दागिने हे टेम्पल ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी, नवनव्या प्रकारच्या फुलांची डिझाईन आणि डिझायनर कपडे अशा गोष्टींकडे तरुणींचा कल वाढला आहे. तर मुलांमध्ये अतिशय साध्या पद्धतीने धोतर कुर्ता किंवा शेरवानी धोतर अशा कपड्यांना वाव दिला जात आहे. पूर्वी शिवले जाणारे कोट सूट किंवा थ्री पीस यांना सध्या फाटा मिळत आहे. तर सॅटीनच्या भरजरी शालू ऐवजी साध्या रंगाच्या जांभळ्या, गुलाबी आणि हिरव्या, पिवळ्या अशा पैठणीला किंवा वर्कच्या साडीला जास्त महत्व देत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या जड शालूला आता ऑप्शन मिळाला आहे.
आम्हाला मुंडाआहेर केला म्हणून रुसून बसणाऱ्या अनेक मंडळींना सध्या असाच आहेर केला, तसाच आहेर केला, तुझी साडी भारी माझी साडी भारी नाही, अशी म्हणण्याची संधीच उरली नाही. कारण आहेराचे देखील रूप बदलले आहे. याची खरी पद्धत सध्या केवळ ग्रामीण भागात उरली आहे. वधू वरांना आवश्यक अशा वस्तूंचा आहेर करण्याची किंवा कलात्मक गोष्टी देण्याची पद्धत रुढ होत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.