आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता राज्यभरातून हजारो भाविक येत असतात. पण येथील प्रवासी सुविधेकडे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानकाच्या इमारतीचे छत अतिशय खराब झाल्याने कधी कोसळेल याची भीती प्रवाशांना वाटत आहे.तसेच बेशिस्त रिक्षा आणि विनापरवाना फळगाड्यांचा गराडा बसस्थानकाला पडल्याचे दिसते.
परिणामी चालकास एसटीबस काढत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रवाशांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. ही दररोजची परिस्थिती असताना देखील पोलीस यंत्रणा व आगार व्यवस्थापकांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याच्या प्रवाशातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
अनेक वर्षापासून काहीच फरक नाही
आम्ही गेली अनेक वर्षा पासून श्री स्वामी समर्थाच्या दर्शनास येतो. बसस्थानकाची अवस्था जशीच्या तशी आहे. वाहतुक कोंडीही मोठी होत असते. शासनाने तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील बस स्थानकाचे प्राधान्याने सुधारणा करावी. पोलिस यंत्रणादेखील या ठिकाणी नेहमी कार्यरत असावी.- नरेंद्र शिंगवी, स्वामी भक्त पुणे
बसस्थानकापासून २०० मीटर अंतरापर्यंत अवैध प्रवासी वाहतूक असू नये. यासाठी मी वेळोवेळी पोलीस प्रशासनास पत्रव्यवहार केला आहे. पोलीस आल्यानंतर वहाने निघून जातात. पोलीस गेल्यानंतर परत अवैध वहानांची वर्दळ जैसेथे असतो. एसटी बस बाहेर काढताना किंवा बसस्थानकात प्रवेश करताना चालकासोबत अनेक वेळा वादविवाद होत आहेत. - रमेश मंथा, आगार व्यवस्थापक, अक्कलकोट
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.