आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचंड कोंडी:चालकांना पर्यायी मार्गाची माहितीच नसल्याने कोंडी ; जुना तुळजापूर नाक्यावर वाहने तटली

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोजागरी पौर्णिमेनिमित्त पायी जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे तुळजापूर रस्ता १० ऑक्टोबरपर्यंत जडवाहनांसाठी बंद केला आहे. या मार्गावरील सर्व वाहतूक वळवल्याने जुना तुळजापूर नाका, मार्केट यार्ड चौक, जुना बोरामणी नाका शांती चौकात वाहतुकीची कोंडी प्रचंड वाढली आहे.

शुक्रवारी दिवसभर वाहने मंदगतीने पुढे सरकत होती. औरंगाबाद, उस्मानाबाद, बार्शी, हैदराबाद व पुणे मार्गावरून आलेली वाहने जुना तुळजापूर नाका चौकात येत होती. तेथून पुढे मार्ग कुठला आहे, कसे जायचे याची चौकशी आणि गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. वाहतूक पोलिस प्रत्येक चौकात नेमले पण वाहनचालकांना नीट माहिती मिळत नसल्याने गोंधळाची स्थिती होती.

तुळजापूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबादला जाण्यासाठी कोणत्या रस्त्याने जायचे याबद्दल गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. सोलापूरहून इटकळमार्गे तुळजापूरला जाण्यासाठी मुभा आहे. औरंगाबादला बार्शी, येडशीमार्गे बीडच्या दिशेने जाण्यास मुभा आहे. याची वाहनचालकांना माहिती नसल्यामुळे अथवा कुठल्या दिशेने जायचे याबाबत संभ्रमावस्था दिसली. मात्र, पोलिस प्रत्येक वाहनचालकाला कुठल्या दिशेने जायचे आहे, कसे कुठे जायचे आहे विचारून त्यांना मार्गदर्शन करताना दिसत होते.येथे आणखी पोलिसांची गरज आहे.

मार्केट यार्ड चौकात वाहनांची गर्दी
मार्केट यार्ड चौकातही कोंडीच पाहायला मिळाली. अनेक वाहने मार्केट यार्डमार्गे हैदराबादकडे जात असल्यामुळे एकदमच वाहनांची संख्या वाढली आहे. पोलिस टप्प्याटप्प्याने वाहने सोडत होते. असेच चित्र जुना बोरामणी नाका, शांती चौकातही पाहायला मिळाले. वाहतूक पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध व त्यांचे पथक वाहतूक नियोजन करताना दिसत होते.

बातम्या आणखी आहेत...