आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछ. शिवाजी महाराज चौक ते नवीवेस पोलिस चौकी या मार्गावर हॉटेल शीतलपर्यंत रस्त्यावर दुभाजक टाकल्याने वाहतूक कोंडी कमी झाली. पण, जनता बँक ते हॉटेल स्नोमेन्सकडून वाहने शिवाजी चौक आणि नवीवेस चौकीकडे वळतात.
यावेळी शितल हाॅटेलजवळ वाहतूक कोंडी होत आहे. बॅरिकेडिंग आणखी भागवत टाॅकीजपर्यंत तरी आणावेत अथवा चार- पाच दुभाजक तरी काढून घ्यावेत. तरच यावर नियोजन होऊ शकते. शनिवारी दोन रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकले होते. विशेष म्हणजे समोरच खड्डा पडला आहे.
या ठिकाणी वाहतूक संथगतीने : अक्कलकोट रस्ता महालक्ष्मी मंदिराजवळ, कारिगर पेट्रोल पंप ते प्रथम हॉटेल परिसर, चार पुतळा ते सरस्वती चौक आणि लकी चौक, सम्राट चौक ते रूपाभवानी मंदिर कडे जाणारा रस्ता. या मार्गावर खड्डे पडले आहेत. रस्ते उखडले आहेत.
हॉटेल शीतलसमोर बॅरिकेडिंग केले आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी अथवा काही नियोजनात बदल अपेक्षित असल्यास पाहणी करून निर्णय घेऊ.'' अजय परमार, सहायक पोलिस आयुक्त
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.