आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कर दिवशी शिकार करणाऱ्यांना थेट तुरुंगवास, सावधगिरीचा इशारा

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लक्ष ठेवण्यासाठी वन्यजीव विभागाने प्राणिमित्रांच्या मदतीने पथके नेमली, जनावरे सजवण्याच्या साहित्याने दुकाने सज्ज झाली

महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात कारहुणवी (कर्नाटकी बेंदूर) सणाचा दुसरा दिवस कर दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने शेत-शिवारात वन्यजीवांच्या शिकारींची प्रथा आहे. सीमावर्ती तालुक्यांमध्ये छुप्या पद्धतीने शिकारीचे प्रकार घडतात. त्या विरोधात वनविभाग, वन्यजीवप्रेमींनी विशेष गस्ती पथक तैनात केले आहे. तसेच, ड्रोन कॅमेरा व ट्रॅप कॅमेराद्वारे सीमावर्ती भागामध्ये लक्ष ठेवण्यात येत असल्याचे उ‌पवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले.

दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा तालुक्यात शिकार होण्याची शक्यता आहे. या साठी पाच विशेष पथके नियुक्त केली असून दक्षिण तालुक्यात मंद्रूप, माळकवठे, हत्तूर, औराद, तेलगाव शिवार कुंभारी, वळसंग, चपळगाव, धोत्री, अक्कलकोट तालुक्यात शिरवळ, वागदरी, पानमंगरुळ, तडवळ, मैंदर्गी शिवारात दोन सशस्त्र पथके नियुक्त केली आहेत. १५ जून रोजी ‘कर’ दिन आहे. त्यानिमित्ताने विशेष खबरदारीच्या उपाययोजना राबिण्यात येत आहेत.

तीन वर्षांपूर्वी वागदरी (ता. अक्कलकोट) शिवारमध्ये कर्नाटकातील काहींनी महाराष्ट्र हद्दीमध्ये येऊन १२ ससे, घोरपडीच्या शिकारी केल्याचे उघड झाले. त्याप्रकरणी वनविभाग, पोलिस व नेचर कॉन्झव्हर्ेशन सर्कलच्या सदस्यांनी २० जणांना ताब्यात घेऊन कारवाई केली होती.

मांसाचा नैवेद्य आळबळकव्वा देवीस अर्पण करण्याची प्रथा वन्यजीवांची शिकार करून त्या मांसाचा नैवेद्य गावच्या वेशीतील ‘आळबळकव्वा’ देवीस अर्पण करणे, मानकऱ्यांच्या गोठ्यात पुरणे व शिल्लक राहिलेल्या वाटून घेण्याची प्रथा आहे. शेत-शिवारामध्ये काठ्या, कुऱ्हाडी, कुत्र्यांसह जाऊन ससे, घोरपड, हरिण आदी वन्यजीवांची शिकार करण्यात येते. पूर्वी त्या प्राण्यांचे मृत शरीर दोरीला लटकवत त्याची गावातून मिरवणूक काढण्यात येते. वनविभागामुळे प्रथा बंद झाली. मात्र शिकारीचे प्रकार काही भागात अजूनही घडतात. गेल्या चार दिवासांपासून वनविभागाने सीमावर्ती भागामध्ये दवंडी, गावकऱ्यांशी संवाद मोहीम सुरू केली आहे. राखीव अथवा खासगी क्षेत्रात वन्यप्राण्यांची शिकार, त्यास मदत करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मोहीम आयोजिली आहे.

बातम्या आणखी आहेत...