आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्शीतील चार महिलांचा जीव घेणारा कारखाना बेकायदाच:आैद्योगिक संचालनालयाचा ठपका, आग प्रतिबंधक नव्हते

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिराळे-पांगरी (ता. बार्शी) येथील फटाके कारखान्याच्या दुर्घटनेची सोमवारी आैद्योगिक सुरक्षा संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. प्राथमिक पाहणीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या. हा कारखाना विनापरवानाच चालत होता, तिथे आग प्रतिबंधक साधने नव्हती. कामगार सुरक्षेचे उपाय नव्हते. विशेष म्हणजे दारूगोळा साठवणुकीची पद्धत फार धोकादायक होती. सलग पद्धतीने त्याचे साठे होते. त्यामुळे स्फोटांची मालिका सुरू झाली. त्याने आगीचे प्रचंड लोळ उठले. त्यातून कामगारांना बाहेर पडणे अवघड झाले. त्यामुळे जीवितहानी झाल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले.

अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे सोमवारीही घटनास्थळी शोधकार्यात होते. दारूगोळा साठवणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडूनच परवाने दिले जातात. या कारखान्याने त्याचा परवाना घेतला किंवा कसे याची माहिती घेण्यास सांगितले आहे. प्राथमिक पाहणीनुसार कारखाना चालवणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कारखान्याने पेट घेतला. स्फोटांची मालिकाच सुरू झाली. आत १० महिला काम करत होत्या. पैकी पाच महिला सुखरूप बाहेर पडल्या. उर्वरित पाच महिलांना आगीने लपेटले हाेते. त्यात चार महिलांचा तडफडून मृत्यू झाला. एक महिला गंभीर असून उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...