आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताचा धोका:मंदिर ते मार्केट चौकी रस्त्यावर घाण पाणी

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट सिटी योजनेत सिद्धेश्वर मंदिर ते मार्केट पोलिस चौकीपर्यंत सिमेंटचा रस्ता करण्यात आला आहे. मात्र, एक बाजू अपूर्ण राहिली आहे. त्या रस्त्यावर ड्रेनेजचे घाण पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप होत आहे. ते चुकवण्यासाठी काही वाहनचालक चुकीच्या दिशेने जात असल्याने अपघाताचा धोका आहे.

जानेवारी महिन्यात गड्डा यात्रा भरणार आहे. या काळात या रस्त्यावर सिध्देश्वर पालखी आणि नंदीध्वज मार्गक्रमण करणार आहे. या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. मैलामिश्रीत पाण्याच्या मार्गावरून नंदीध्वजास जावे लागेल. त्या रस्त्याचे काम आणि ड्रेनेज लाइनची क्षमता वाढवण्यासाठी स्मार्ट सिटीतून तरतूद केली पण महापालिकेने त्या जागेचा वाद मिटवला नाही.

वक्फ बोर्डाचे सदस्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यास स्थगिती मिळवली. त्यामुळे काम थांबवले. त्या रस्त्यावर दोन ड्रेनेज चंंेबर असून, त्या चेंबरमधून मैलामिश्रीत पाणी रस्त्यावर येत आहे. ती पाइप लाइन ६ इंच व्यासाची आहे.

त्यात वाढ करून २४ इंची करण्याचा प्रयत्न होता पण ते काम होऊ शकले नाही. मैलामिश्रीत पाण्यामुळे त्या मार्गावरून जाणारे विद्यार्थी, नागरिक, भक्तांना त्रास होतो. मैलामिश्रीत पाण्यातून वाट काढत जावे लागते. खड्डे पडल्याने त्यात मैलामिश्रीत पाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.

रस्ता दुरुस्ती करतोय
ड्रेनेज लाइनमध्ये कॅरिबॅग, बाटल्या येऊन अडकतात. त्यामुळे रस्ता दुरुस्ती करण्यात येते. यात्रा काळात दुरुस्ती करून खबरदारी घेऊ.”-सारिका आकुलवार, झोन अधिकारी

पालिका सहकार्य करत नाही
आम्ही महापालिकेस सहकार्य करण्यास तयार आहोत, महापालिका आम्हाला सहकार्य करत नाही. रस्त्याची जागा आमच्या कमिटीच्या मालकीची आहे. न्यायालयात दाद मागितली.’’ -जब्बार शेख, वक्फ बोर्डाचे ट्रस्टी

बातम्या आणखी आहेत...