आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट:वंचित मुलांनी पाहिला अक्षयकुमारचा पृथ्वीराज चित्रपट ; अक्षयकुमारच्या चाहत्यांनी आपला आनंद द्विगुणीत केला

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता अक्षयकुमार याचा पृथ्वीराज चौहान हा चित्रपट मुळेगाव येथील परमेश्वर काळे संस्कार संजीवनी फाउंडेशनचे वंचित विद्यार्थी मुलामुलींना दाखवून अक्षयकुमारच्या चाहत्यांनी आपला आनंद द्विगुणीत केला. यावेळी जवळपास २५ हून अधिक विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहिला. या प्रसंगी अक्षयकुमार क्लबचा प्रमुख अक्षय जगलेकर याने यावेळी ८० किलोचा हार आणि ढोलताशाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या खिलाडी ग्रुप फाउंडेशन, बालाजी वेलपुकोंडा, मनहर कोंडी, मयूर बारड, प्रेम गुज्जर, निशांत वन्नम, निरंजन कुलकर्णी, तुषार म्हेत्रे, चेतन धारा, प्रशांत येमूल, सिद्धेश्वर रणदिवे, धनाजी लोंढे, गणेश गोरनाळ, राजू बंडा, अजय देडे, आकाश चव्हाण, परमेश्वर काळे, अरुणा काळे, नितीन भोसले, सचिन पवार, हिंदुराव गोरे, सुरेखा भोसले, रेखा भोसले आणि इतर उपस्थित होते. आम्हाला पृथ्वीराज महाराजांचा चित्रपट दाखवला. अक्षयकुमारचा मस्त रोल आहे. चित्रपट खूप खूप आवडल्याचे विद्यार्थीनी ईश्वरी पवार हिने सांगितले. ज्या मुलांना चित्रपट गृह म्हणजे काय हे माहीत नव्हतं अशा सर्व मुलांना चित्रपट दाखवण्याचं काम या युवा कार्यकर्त्यांनी केलं त्याबद्दल अभिनंदन. मुलांना इतिहासातले व्यक्तिमत्त्व पहायला मिळालं याचा अधिक आनंद झाला, असे संस्था चालक परमेश्वर काळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...