आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:उजनी समांतर जलवाहिनीसाठी फेरनिविदा काढण्याची आफत; दोनच मक्तेदार आल्याने निर्णय

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उजनी ते सोलापूर १७० एमएलडीचे समांतर जलवाहिनी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने घालण्यात येणार आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली. यासाठी दोनच मक्तेदार आले. नियमाने तीन मक्तेदार असणे आवश्यक असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने स्पष्ट करण्यात आली. त्यामुळे पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया करण्याचा आदेश कंपनीचे चेअरमन असिम गुप्ता यांनी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिला. महापालिका आवारात बांधण्यात येत असलेल्या कमांड अँड कंट्रोल या इमारतीमधील सुविधेबाबत महापालिका व पोलिस आयुक्तांनी मिळून आठवड्यात सांगावे, असे बैठकीत ठरले. पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांना संचालक म्हणून मान्यता देण्यात आली.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी संचालक मंडळाची त्रैमासिक बैठक मंगळवारी नियोजन भवन येथील सभागृहात चेअरमन असिम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस चेअरमन गुप्ता, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर ऑनलाइन तर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ, केंद्र सरकारचे प्रतिनिधी पी. सी. धसमाना, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील, मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, शहर अभियंता संदीप कारंजे आदी प्रत्यक्षात उपस्थित होते. समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव होता.

कामासाठी तीन मक्तेदारांनी निविदा भरणे आवश्यक असताना दोनच मक्तेदार आल्याची माहिती समोर आली. त्यांनी उजनी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियमानुसार किमान तीन ठेकेदार निविदा प्रक्रियेत सामील होणे आवश्यक आहे. मात्र या प्रकल्पाच्या निविदेमध्ये दोन ठेकेदार सामील झाल्याने निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने मागवण्याचा निर्णय घेण्यात आला. एकात्मिक नियंत्रण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, याबाबतची निविदा मंजूर करण्याचा निर्णयही झाला आहे. याबाबतच्या दुरुस्त्या पोलिस आयुक्त, पालिका आयुक्त यांनी १५ जूनपर्यंत कराव्यात, असे गुप्ता यांनी सांगितले.

पावसाळामुळे काम वर्षानी पुढे जाण्याची शक्यता
टेंडर प्रक्रिया महिन्यानी पुढे जाण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात टेंडर प्रक्रिया अडकल्याने काम सुरू होण्यास सप्टेंबर व आॅक्टोबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलवाहिनी व जॅकवेलचे काम सुरू होण्यास विलंब लागणार आहे.

पोलिस आयुक्त हिरेमठ संचालक : स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक पदावर नवे पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांची नियुक्ती करण्यात आले. त्यांचे स्वागत पालिका आयुक्त पी. शिवशंकर. पी. सी. दसमाना, त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...