आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसामुळे:उजनी धरणातून भीमात 60 हजार क्युसेकचा विसर्ग

टेंभुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उजनी धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून ६० हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात येत अाहे. यात आणखी वाढ होणार असून भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या दौंड येथून २५ हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात येत आहे. उजनी पाणीपातळी १०९.६८ टक्के झाली असून १२२.४२ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला. हवामान खात्याने ११ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज असल्याने उजनी धरणातून आणखी पाणी सोडले जाण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली.

गेल्या आठवड्यात पाऊस थांबला असल्याने उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडणे बंद करण्यात आले होते. ४ सप्टेंबरपासून उजनी पाणीपातळीत पुन्हा वाढ होऊ लागल्याने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ३० हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला होता. ८ रोजी सकाळी ९ वाजेपासून वाढ करण्यात आली. सकाळी ४० हजार, दुपारी १२ वाजता ५० हजार, दुपारी २ वाजता ६० हजार क्युसेक अशी विसर्गात वाढ करण्यात आली. वीजनिर्मितीसाठी १ हजार ६०० क्युसेक विसर्ग असा एकूण ६१ हजार ६०० क्युसेक विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

सध्या सुरू असलेला पाण्याचा विसर्ग : सध्या बंडगार्डन येथून १३ हजार ३९१ आणि दौंड येथून २० हजार १८४ क्युसेक विसर्ग उजनीत मिसळत आहे. भीमा खोऱ्यातील घोड धरणातून २ हजार, वडज ४ हजार ५१०, डिंभे ४ हजार ८७७, घोड २४ हजार ६०१, विसापूर ४०१, चिलेवाडी १ हजार ६५०, कळमोडी ५३१, चासकमान २ हजार ७७०, भामा असखेड ५९६, आंध्रा १ हजार १५२, पवना २ हजार ९०९ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. सर्वाधिक विसर्ग घोड धरणातून उजनी धरणात मिसळत असल्याने उजनी धरणाच्या जलपातळीत वाढ होत आहे. गुरुवारी सकाळपर्यंत ५६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...